पीक विम्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना कशी द्याल?

२७ आणि २८ डिसेंबरला राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि अवेळी पाऊस झाला. त्यानेप्रभावित झालेल्या महसूल मंडळांमधीलनुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनीआपल्या पिकाच्यानुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्याचेआवाहन कृषीविभागानेकेलेआहे. ती पूर्वसूचना देण्याचे विविध मार्ग कोणते, वाचा सविस्तर...
Pik Vima
Pik Vima

२७ आणि २८ डिसेंबरला राज्यात काही ठिकाणी गारपीट (hailstorms) आणि अवेळी पाऊस झाला. त्याने प्रभावित झालेल्या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीकडे (crop insurance company) सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

२७ व २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात काही ठिकाणी गारपीट, अवेळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तूर आणि कापूस पिकांचे नुकसान झाले. तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचेही नुकसान झाले. त्याचबरोबर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांच्या नुकसानीच्या बातम्या समोर येत आहेत.

- कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

जिथे पिकांचे नुकसान झाले, अशा अधिसूचित महसूल मंडळांमधील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असते. याबाबतची पूर्वसूचना (intimation) आपल्या संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी पुढील पर्यायांचा वापर करता येईल -

१. क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop insurance app) २. विमा कंपनी टोल फ्री क्रमांक (Toll free number) ३. विमा कंपनीचा ई-मेल (e-mail) ४. विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय (insurance company office) ५. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय (cirle officer) ६. ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा (bank branch)

हे देखील पाहा -

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास आपल्या संबंधित विमा कंपनीकडे पूर्वसूचना (intimation) सादर करावी, असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

कालपासून विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची हजेरी लागली. तर सहा ते सात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. आता येत्या चोविस तासांमध्ये विदर्भात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, आणि गोंदीया या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ३१ डिसेंबरलाही पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यातले हवामान प्रामुख्याने कोरडं राहण्याचा अंदाज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com