मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती : नितीन राऊत

मी विजबील माफीची घोषणा आपण कधीही केली नाही, असेस्पष्टीकरणही राऊत यांनी विधानसभेत दिले. विजबिलाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरू होती.
मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती : नितीन राऊत
Vij bill mafi

मुंबई : आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Live) सुरू झाले. त्यात शेतीपंप आणि वाढीव विजबिलाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यावर राज्यात व्यापक असे कृषीपंप विजजोडणी धोरण 2020 लागू केले असल्याची माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सभागृहात बोलताना दिली.

पण राज्यात 2017 पासून शेतकऱ्यांना विजबीले मिळाली नसून सरकारचे याबाबतचे धोरण काय, अशी लक्षवेधी काँग्रेस पक्षाचे सभागृहातील नेते नाना पटोले यांनी मांडली. शेतकऱ्यांना सध्या मिळणारी आठ तास विजेची उपलब्धता ही बारा तासांवर नेली पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.

ग्रामीण पाणी पुरवठ्यातील अडचणीही यावेळी मांडण्यात आल्या. यावर बोलताना, "सौर उर्जेवरचे पंप ज्यांच्याकडे असतील, अशा शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करता येऊ शकतो," अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. गेल्या सरकारच्या काळात विजबीलांची वसूली झाली नसल्यामुळे थकबाकी वाढली असून विजबीलांची रक्कम वाढत गेल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

"मी विजबील माफीची घोषणा आपण कधीही केली नाही," - नितीन राऊत

असे "मी विजबील माफीची घोषणा आपण कधीही केली नाही," असे स्पष्टीकरणही राऊत यांनी विधानसभेत दिले. यावर समाधान न झालेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि नाना पटोले (Nana Patole), यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी उत्तर द्यावे, अशी मागणी केली.

सत्ताधारी आणि विरोधी, अशा दोन्ही बाकांवरील सदस्यांची ही मागणी असल्यामुळे ती मान्य करत प्रभारी अध्यक्षांनी प्रश्नाचे उत्तर राखून ठेवले आहे. आता या मुद्द्यावर उद्या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार काय उत्तर देतात, त्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com