सोयाबीन बाजार सुधारला

देशातील खाद्यतेल आणि तेलबिया नियंत्रणासाठी मागील आठवड्यात सरकारने वायदेबंदी, रिफाईंड पाम तेल आयातीच्या कालावधीत वाढ आणि सोयापेंडेवर साठा मर्यादा लादण्याचे आदेश काढले. मात्र, जागतिक बाजारातील तेजी आणि देशातील शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्याने बाजारात सुधारणा आणि घट सुरुच आहे. मात्र आठवड्याचा शेवट सोयाबीन दर सुधारणेने झाला आहे.
सोयाबीन बाजार सुधारला
soybean rate

गेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय घेऊन सोयाबीनचे दर (soybean rate) नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि शेतकऱ्यांनी कमी केलेली सोयाबीन विक्री यामुळे आठवड्याचा शेवट दर सुधारणेने झाला आहे. आठवडाभरात सोयाबीन ५५०० ते ६४०० रुपयाने विकले गेले. तर आज सोयाबीनला ५८०० ते ६६०० रुपये दर मिळाला आहे. तर प्लांट्सचे दर ६७०० रुपयांवर होते, चालू आठवड्यात दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

देशातील खाद्यतेल (edible oil) आणि तेलबिया नियंत्रणासाठी मागील आठवड्यात सरकारने वायदेबंदी, रिफाईंड पाम तेल आयातीच्या कालावधीत वाढ आणि सोयापेंडेवर साठा मर्यादा लादण्याचे आदेश काढले. मात्र, जागतिक बाजारातील तेजी आणि देशातील शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्याने बाजारात सुधारणा आणि घट सुरुच आहे. मात्र आठवड्याचा शेवट सोयाबीन दर सुधारणेने झाला आहे. मागील आठवड्यात देशभरातील बाजारांमध्ये सोयाबीनची सरासरी २ लाख ५० हजार पोत्यांच्या दरम्यान आवक राहिली. प्रक्रिया उद्योगाकडून (processing industry) मागणी होतीच, त्यातच आवक कमी राहिल्याने दराला आधार मिळाला. आठवडाभरात सोयाबीनला ५५०० ते ६४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

हे देखील पाहा - 

https://youtu.be/ArneQjYW5E8

सरकारने सोयापेंडवर (soyameal) साठा मर्यादा (stock limit order) लावत उद्योगांना ९० दिवसांच्या क्षमतेएवढी मर्यादा दिली. मात्र, प्रक्रिया उद्योगाकडे साठामर्यादेपेक्षा जास्त सोयापेंड साठा नाही, कारण यंदा सोयाबीन आवक कमी आहे, तसेच दरही अधिक आहेत. त्यामुळे या दराला सोयापेंडचा मोठा साठा कुणीही केला नाही. त्यामुळे या निर्णयाचा बाजारावर परिणाम दिसत नाही, असे इंदौर येथील एका प्रक्रियादाराने सांगितले.

आता राज्यात मागील आठवडाभरात सोयाबीन बाजार (Maharashtra soybean rate) कसा होता ते पाहू. राज्यात सोयाबीनला मागील आठवड्यात ५६०० ते ६३०० रुपये सरासरी दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचा दर ६२०० ते ६४०० रुपयांच्या दरम्यान होता. आज बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ५६०० ते ६४०० रुपये दर मिळाला. तर प्लांट्सचा दर हा ६७०० रुपयांवर होता. केंद्राच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली आहे.

आता मध्य प्रदेशात सोयाबीन दर (MP soybean rate) काय राहिल ते पाहू. २० डिसेंबरला केंद्राने सोयाबीनवर वायदेबंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली. त्यामुळे दरावर फारसा परिणाम झाला नाही. तर दरात मागील आठवड्यात चढ-उतार होत शेवटी २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली. मध्य प्रदेशात सोयाबीनला ५६०० ते ६४५० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५६०० ते ६५०० रुपयांपर्यंत होता.

सोयापेंड दराची स्थिती

सोयाबीनसह सोयापेंड बाजारातही चढ-उतार राहिले. सोयापेंडची मागणी सामान्य राहिली. मागील आठवड्यात सोयापेंडला देशभरात ५२ हजार ते ५७ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. मध्य प्रदेशात ५२ हजार ते ५४ हजार रुपयांच्या दरम्यान व्यवहार झाले. तर महाराष्ट्रात ५५ हजार ते ५७ हजार रुपये दर मिळाला. तसेच राजस्थानमध्ये ५३५०० ते ५४४०० रुपयाने सोयापेंड विकले गेले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.