भारताची गहू निर्यात १०० लाख टनांवर ?

रशियन लष्कराच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील खरेदीदारांकडून भारताच्या गव्हाला प्राधान्य दिल जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. भारताकडे गव्हाचा मुबलक साठा उपलब्ध असून एप्रिलपासून बाजारात नवे उत्पादन दाखल होईल, त्यामुळे भारताकडे निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात गहू उपलब्ध असणार, असंही अमेरीकेच्या कृषी विभागानं (US Department of Agriculture) म्हटलं आहे.
 India’s wheat exports to top 10 mt this fiscal
India’s wheat exports to top 10 mt this fiscal

रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात (Wheat Export) विक्रमी अशा १०० लाख टनांवर जाण्याची शक्यता असून तांदूळ निर्यातीत (Rice Export) गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) वर्तवलाय. 

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या 'ग्रेन: वर्ल्ड मार्केटस अँड ट्रेड' (Grain: World Markets and Trade) या अहवालानुसार भारत यंदा विक्रमी स्वरूपात गहू निर्यात (Wheat Export) करणार आहे. गेल्या वर्षीच्या ३५.८ लाख टन गहू निर्यातीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात भारतीय गव्हाची निर्यात १०० लाख टनांचा पल्ला गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.   

गेल्या वर्षीच्या २११ लाख टन तांदूळ निर्यातीच्या तुलनेत या वर्षात २०५ लाख टन तांदळाची निर्यात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.  गेल्या हंगामातील ३६७ लाख टन मका निर्यातीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात २८० लाख टन मक्याची निर्यात होणार असल्याचं या अहवालात म्हटलंय. मात्र रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे भारताच्या मका आणि तांदळाच्या निर्यातीत किंचित सुधारणेची शक्यता असल्याचंही अमेरिकेच्या कृषी विभागाने (US Department of Agriculture) नमूद केलं आहे.    

रशियन लष्कराच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील खरेदीदारांकडून भारताच्या गव्हाला प्राधान्य दिल जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. भारताकडे गव्हाचा मुबलक साठा उपलब्ध असून एप्रिलपासून बाजारात नवे उत्पादन दाखल होईल, त्यामुळे भारताकडे निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात गहू उपलब्ध असणार, असंही अमेरीकेच्या कृषी विभागानं (US Department of Agriculture) म्हटलं आहे. 

व्हिडीओ पहा- 

भारताने आजवर शेजारच्या बांगलादेशालाही गहू पुरवलेला आहे. रास्त दरात गहू पुरवण्याच्या भारताच्या क्षमतेमुळे आफ्रिका आणि इतर आखाती देशातूनही भारताच्या गव्हाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. जुलै २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान भारताने बांगलादेशला ५२ लाख टन गहू निर्यात केलेला आहे. यापुढेही भारताची बांगलादेशात असणारी निर्यात सुरु राहणार आहे. 

भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जानेवारी दरम्यान भारताने १.७४ अब्ज डॉलर्सचा गहू निर्यात केलेला आहे.  गेल्या वर्षी याच काळात भारताने ३५८ लाख डॉलर्सचा गहू निर्यात केला होता.

व्हिडीओ पहा-   

अपेडाने  (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जानेवारी दरम्यान भारताची गहू निर्यात ५४ लाख टनांवर गेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात भारताने १७ लाख टन गहू निर्यात केला होता.    

रशिया- युक्रेन संघर्ष आणि जागतिक बाजारातील गव्हाचे वाढलेले दर यामुळे गेल्या अनेक वर्षांत प्रथमच भारतीय गव्हाची मागणी वाढल्याचं अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हटलं आहे. 

अमेरिका, अर्जेंटिना आणि युरोपच्या प्रति टन ४२५ डॉलर्स या दराच्या तुलनेत भारताचा गहू निर्यातीसाठी प्रति टन ३५० डॉलर्सला उपलब्ध होत असल्याने जागतिक बाजारातील  खरेदीदारांकडून भारतीय गव्हाला पसंती दिली जाण्याची शक्यता असल्याचंही अमेरिकेच्या कृषी विभागानं नमूद केलंय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com