खतांची दरवाढ रोखण्यासाठी के. चंद्रशेखर रावांचे मोदींना पत्र

उत्पादन खर्च वाढवून, हमीभावाविषयी चुकीची धोरणे राबवून हे सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ कशी करणार आहे ? असा सवालही के.चंद्रशेखर राव यांनी मोदीना पाठवलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.
kcr and modi
kcr and modi

केंद्र सरकारने खतांचे दर  तत्काळ नियंत्रणात आणावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करत चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. 

केंद्र सरकारच्या शेतमालाच्या हमीभावाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि खतांच्या दरवाढीमुळे शेती आर्थिकदृष्ट्या नुकसानीत जात असल्याचा आरोप करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

शेतकऱ्यांकडून सर्वाधिक वापरले जाणारे नायट्रोजन,फॉस्फरसच्या किमती गेल्या तीन महिन्यांत ५० टक्क्यांनी आणि पोटॅशियमच्या किमती १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेल्या केंद्र सरकारने प्रत्यक्षात गेल्या ५ वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ करून ठेवली आहे. 

खतांची दर भरमसाठ वाढवले आहेत, इंधनाचे दर वाढले आहेत, त्यात सरकारचे हमीभाव देण्याचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांना शेती करण्यापासून परावृत्त करते आहे. उत्पादन खर्च वाढवून, हमीभावाविषयी चुकीची धोरणे राबवून हे सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ कशी करणार आहे ? असा सवालही के.चंद्रशेखर राव यांनी मोदीना पाठवलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.    राज्यातील भातपिकाची खरेदी एमएसपी दराने होत नसल्यामुळे आधीच संतप्त झालेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आता खतांच्या दरवाढीमुळे चांगलेच उखडले आहेत. त्यासाठी राव यांनी आता भातपिकाच्या मुद्यावरून केंद्राशी मतभेद असणाऱ्या अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधायला सुरुवात केली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी राव यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारिया विजयन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची भेट घेतलेली आहे. 

केंद्रातील सरकार सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. इंधन दरवाढ, खतांच्या वासधात्या किंमती आणि भातपिकाची हमीभावाने खरेदीस दिलेला नकार यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत असल्याबद्दलचा संतापही राव यांनी मोदीना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com