कागलच्या जनावरांच्या बाजाराला मिळतोय चांगला प्रतिसाद

कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून जनावरांचा बाजार सुरूकरण्यात आला आहे
कागलच्या जनावरांच्या बाजाराला मिळतोय चांगला प्रतिसाद
Kagal Cattle Market

कागल  : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. मागील सात आठवड्यांपासून हा बाजार (Cattle Market) सुरू असून या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Kagal Catel Market Getting Good Rescponse)

दर बुधवारी हा बाजार भरत असून या बाजारातून सुमारे सव्वा कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. या बाजारामुळे शेतकरी, पशुपालक व्यावसायिकांची चांगली सोय झाली आहे.येथील राष्ट्रीय महामार्गालगत कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kolhapur District Agriculture Market Comittee)  मालकीची मोठी जागा पडून होती. ही जागा वापरात आणण्याच्यादृष्टीने संचालक मंडळाने जनावरांचा बाजार सुरू करण्याचे ठरवले. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या बाजाराला सुरुवात करण्यात आली. या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे .

या बाजारात कराड (Karad), मिरज (Miraj), कवठेपिरान, संकेश्वर, गोकाकसह करवीर व कागल, करवीर ग्रामीण भाग आदी भागातून व्यापारी व शेतकरी येऊन मोठ्या प्रमाणात जनावराची खरेदी - विक्री करीत आहेत . यात प्रामुख्याने मुर्रा (रिंग ), करनाळ, पंढरपूरी या दुधाला जास्त असणाऱ्या जातवान म्हशी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. यांची विक्रीही होत आहे. या म्हशी ५० हजारापासून सव्वा लाखापर्यंत दराने विक्री होत आहेत . याचबरोबर जर्शी गाय ( एचएफ) लाही मागणी आहे .

बुधवारी मिरजेचा बाजार सोडला तर परिसरात कोठेही जनावरांचा बाजार भरत नाही. सोमवारी पेठ वडगाव, मंगळवारी मुरगूड, बुधवारी कागल , गुरुवारी निपाणी, शुक्रवारी संकेश्वर असा जनावरांचा बाजार भरतो. कागलचा हा बाजार राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने या बाजाराला प्रतिसाद मिळत आहे. येथे जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

बाजार समितीच्यावतीने दहा रुपये गेटपास म्हणून आकारले जातात. जनावरांची विक्री झाल्यास २१० रुपयांची कर आकारणी केली जाते. यातून बाजार समितीलाही चांगले उत्पन्न मिळत आहे. दर बुधवारी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा बाजार भरतो. जनावर खरेदीचे प्रमाण ४० टक्के इतके आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.