Kisan Sabha
Kisan SabhaAgrowon

Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणार: किसान सभा

त्याचसोबतच राज्यातील देवस्थान इनाम वर्ग 3 च्या वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) जमिनी (Agriculture Land) शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, अशीही मागणी शेतकरी करत आहेत.

दुधाला एफआरपी (Milk FRP) लागू करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत किसान सभेने (Kisan Sabha) व्यक्त केली. तसेच राज्यातील ऊस पट्ट्यातील कारखानदार आणि मंत्री संगनमताने ऊस एफ.आर.पी. चे (Sugarcane FRP) तुकडे पाडण्याचे मनसुबे रचत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याचा ठराव किसान सभेने घेतला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे किसान सभेचे जिल्हा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष किसन गुजर (Kisan Gujar), राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले (Ajit Nawale) आणि राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख उपस्थितीत होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याची भूमिका किसान सभेने घेतली.

त्याचसोबतच राज्यातील देवस्थान इनाम वर्ग 3 च्या वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) जमिनी (Agriculture Land) शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, अशीही मागणी शेतकरी करत आहेत. मात्र या मागणीकडेही सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही किसान सभेने केला.

राज्यात अतिपावसामुळे खरिपातील पिके बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत. मात्र राज्य सरकार मदतीच्या पोकळ घोषणा करण्यात दंग आहे.

प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मात्र राज्यात दहीहंडी उत्सवात व्यस्त असल्याचे दिसतात. त्यामुळे किसान सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पावित्रा घेणार आहे, अशी माहिती किसान सभेच्यावतीने अधिवेशनात देण्यात आली.

सांगली, कोल्हापूर, सातारा, परिसरामध्ये महामार्गासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनीची भरपाई अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. या शेतकऱ्यांनी वारंवार मागणी व संघर्ष करूनही त्यांच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलेले आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्णय किसान सभेने जिल्हा अधिवेशनामध्ये घेतला.

जाती आणि धर्माच्या भिंती माणसांना माणसापासून दूर करत असून धर्माचा राजकारणासाठी दुरुपयोग केला जात आहे. शेतकरी व श्रमिकांच्या लढ्यांना कमजोर करण्यासाठी आणि आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप (RSS And BJP) धर्माचा दुरुपयोग करून माणसामाणसांमध्ये द्वेष पसरवत आहे. ई डी (ED) सारख्या संस्थांचा दुरुपयोग करून सरकारे पाडली जात आहेत. लोकशाहीला यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. धर्मांध राजकारणाचा प्रभाव वाढत राहणे देशाचे लोकशाही व धर्मनिरपेक्ष स्वरूपालाच आव्हान निर्माण करत आहे, अशी भूमिका किसान सभेने अधिवेशनात मांडली.

दरम्यान आगामी काळात किसान सभेचे कार्य पुढे नेण्यासाठी यावेळी सोळा जणांची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. शेतकरी नेते उमेश देशमुख यांची किसान सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून तर गुलाब मुलानी यांची जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली. माकपच्या जिल्हा सचिव रेहाना शेख, आशा संघटनेचे हनुमंत कोळी, मीना कोळी, एस.एफ.आय. संघटनेचे तुळशीराम गळवे यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.

मिरज येथील कामगार भवन याठिकाणी संपन्न झालेल्या या अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते. मागील सहा वर्षाच्या किसान सभेच्या कामाचा आढावा यावेळी शेतकरी प्रतिनिधींसमोर मांडण्यात आला. सविस्तर चर्चा करून संबंधित अहवाल आणि आगामी कार्याची दिशा प्रतिनिधींनी मंजूर करून स्वीकारली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com