२०२१ च्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेचे बक्षीस किती माहितीये का?

शेतकऱ्यांनीअधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणित्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, आणि तालुका पातळीवर पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे बक्षीस किती आहे माहिती आहे का?
Crop Competition
Crop Competition

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (advance technology) वापर करून अधिकाधिक उत्पादन (maximum production) घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, आणि तालुका पातळीवर पीक स्पर्धेचे (crop competition) आयोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी (rabi season) रब्बी ज्वारी, गहू (wheat), हरभरा, करडई, जवस, तीळ (sesame) ६ पिकांचा समावेश समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान १० आर (0.10 हेक्‍टर)  क्षेत्र आवश्यक आहे.

तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र १००० हेक्टर हून अधिक आहे अशा सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रति पीक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवर वरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग, आणि मग राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

हा व्हिडिओ पाहिलात का? -

एक शेतकरी एकापेक्षा जास्त पिकांसाठीही स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. पण आता ते काढून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क (entrance fees) भरून पीक कापणीवरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार (crop productivity) त्याची तालुका, जिल्हा, विभाग, व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख (last date) 31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने (agriculture department) केले आहे.

या स्पर्धेत जिंकणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिकही देण्यात येतील. या पारितोषिकाच्या रकमा खालीलप्रमाणे -

पारितोषिकाच्या रकमा
अ.क्र स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये
  पहिले दुसरे तिसरे
1 तालुका पातळी 5000 3000 2000
2 जिल्हा पातळी 10000 7000 5000
3 विभाग पातळी 25000 20000 15000
4 राज्य पातळी 50000 40000 30000

महाराष्ट्र कृषी विभागाने (Maharashtra agriculture department) ही स्पर्धा आयोजित केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com