खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसाद

खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसाद
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसाद

जळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप मिळाले नाही. काही शेतकऱ्यांशी संबंधित संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला. चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्‍यातील आडगाव येथे तासभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून दूध दरवाढीची मागणी केली. आंदोलन काही भागांपुरते मर्यादीत राहील्याने दूध संकलन व पुरवठा यासंबंधी कुठेही व्यत्यय आले नाहीत.

चाळीसगाव तालुक्‍यातून मुंबई येथे दूध पुरवठा केला जातो. या भागातील आडगाव येथे काही शेतकऱ्यांनी दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आर.के.पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी  सोमवारी (ता.१६) सकाळी ८.३० ला चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावर तासभर रास्ता रोको केला. लागलीच पोलीस दाखल झाले. त्यांनी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेण्याची सूचना केली. ताब्यात घेण्यात येईल, असे बजावले.  नंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. परंतु कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दूधदरवाढीचे निवेदन देऊन आपल्या सविस्तर मागण्यांबाबत कार्यवाहीची मागणी केली.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, धुळे व शिंदखेडा येथे दूध संकलन व्यवस्थित सुरू होते. जळगाव येथील जिल्हा सहकारी दूध संघ व चाळीसगाव येथील दूध डेअऱ्यांचे संकलन नियमीत होऊन दुधाची पाठवणूक झाली. चोपडा येथील शेतकरी कृती समितीने या आंदोलनाला पाठींबा देत दूधदरवाढीची मागणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com