आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा अंदाज

गेल्या आठवड्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाचाआंबा आणि काजूच्या मोहोरावरपरिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात फळधारणेला उशीर होण्याचा अंदाज आहे.
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा अंदाज
Mango Cashew

वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) आंबा आणि काजूच्या मोहोरावर (Flowring) परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात फळधारणेला उशीर होण्याचा अंदाज आहे. अचानक आलेला पाऊस आणि तापमानातील बदलांचा (Climate Change) फुलोऱ्याच्या प्रक्रियेवर परिणाम होईल. त्यामुळे यंदाचा आंबा आणि काजूचा हंगाम सुरू होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याचे गोव्याचे कृषी संचालक नेव्हिल अल्फान्सो यांनी टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचट   मात्र, पाऊस सतत पडत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत नसल्याचेही नेव्हिल यांनी म्हटले आहे. "कमी प्रमाणात पाऊस पडल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, सतत पाऊस पडला असता, तर त्याचा पिकांवर परिणाम झाला असता," असे नेव्हिल म्हणाले. या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू आणि आंबा ही दोन्ही नगदी पिके यंदाच्या हंगामात आधीच उशिरा मोहोर येण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. त्यातच सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे काजू आणि आंब्याच्या फळधारणेच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सध्या दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात विरोधाभासी फरक जाणवत असून दिवसा उष्णता आणि रात्रीची थंडी जाणवत आहे. अशा विचित्र वातारणाचा काजू (Cashew) आणि आंब्याच्या (Mango) मोहोराला सामना करावा लागत असल्याने मोहोर सुकत आहे. त्यातच अचानक आलेल्या पावसामुळे फळधारणा लांबण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगतात. परिणामी, दोन्ही फळे फुलतील परंतु नियमित वेळेपेक्षा फळे येण्यास उशीर झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.