सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे बाजारभाव

विदर्भ आणि मराठवाड्यातील आजचे सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव वाचा थोडक्यात.
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे बाजारभाव
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे बाजारभाव

विदर्भ सोयाबीन बाजारभाव (vidarbha soybean rates) - कारंजा बाजारात आज सोयाबीनची 5500 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला किमान 5840 रुपये तर कमाल 6535 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6350 हजार रुपयांवर होता. तर अमरावती बाजारात सोयाबीनची 4336 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6000 रुपये होता. तर कमाल भाव 6470 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6235 चा भाव मिळालाय. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 6,868 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 6,868 रुपयांचा दर  मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.

मराठवाडा सोयाबीन बाजारभाव (marathwada soybean rates) - हिंगोली बाजारात आज सोयाबीनची फक्त 800 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 6000 रुपये तर कमाल 6600 रुपये दर मिळालाय. आणि सर्वात जास्त व्यवहार 6300 रुपयांनी झालेत. तर परभणी बाजारात 350 मालाची आवक झाली. या मालाला किमान 6200 तर कमाल 6400 रुपयांचा दर मिळालाय. इथं सर्वसाधारण दर 6300 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे जिंतूर बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 6201 रुपये तर कमाल 6700 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6400 चा होता.

विदर्भ कापूस बाजारभाव (vidarbha cotton rates) - आज परभणी बाजारात कापसाची 680 क्विंटल आवक झालीये. आवक मालाला किमान 9500 तर कमाल 10025 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 9900 चा होता. त्याचबरोबर वर्धेच्या आष्टी बाजारात कापसाची आज 450 क्विंटल आवक झाली. आवक मालाला 10000 रुपयांचा किमान तर 10200 चा कमाल भाव राहिलाय. तसंच सर्वसाधारण भाव 10100 रुपये होता.

मराठवाडा कापूस बाजारभाव (marathwada cotton rates) - आज परभणी बाजारात कापसाची फक्त 320 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 8360 तर कमाल 10350 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 10280 चा होता. तर मानवत बाजारात आलेल्या 2500 क्विंटल कापसाला 8400 ते 10425 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 10260 रुपये होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com