कसे वाढतात अल्पभूधारकांवरील कर्जाचे डोंगर ?

शेतीवर घेण्यात येणारे कर्ज हाच महाराष्ट्रातील बहुतांशी अल्पभूधारक, छोट्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार असतो. केवळ शेतीतील गरजांसाठीच नव्हे तर अगदी मुलांची शिक्षणे, त्यांचे विवाह, विविध सण-समारंभ आणि वैद्यकीय उपचारालाही याच कृषी कर्जाचा आधार त्यांना उपयोगी ठरतो, त्यांची नड भागवत असतो. हे प्रमाण नेमके किती आहे ही गोष्ट खालील सरकारी आकडेवारीनुसार समोर आले आहे.
कसे वाढतात अल्पभूधारकांवरील कर्जाचे डोंगर ?
Marginal Farmers are in dept trap

२०१९ सालच्या ७७ व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील ग्रामीण भारतातील कृषी कुटुंबे व जमीन आणि त्यांच्या परिस्थितीविषयक पाहणीनुसार, बहुतांशी कर्जधारकांकडे ०.०१ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. यातील निम्म्या लोकांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे. केवळ १३ टक्के अल्पभूधारकांनी औपचारिक बँकिंग व्यवस्थेतून कर्ज घेतलेले आहे. ०.०१ ते ०.४० हेक्टरहून कमी जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांपैकी १७ टक्के कुटुंबांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे. तर ३४ टक्के कुटुंबांच्या डोक्यावर व्यावसायिक बँकांच्या कर्जाचे ओझे आहे.           कृषी गणनेत, १ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्यांची वर्गवारी अल्पभूधारकांमध्ये करण्यात आली आहे. तर १ ते २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश छोट्या शेतकऱ्यांमध्ये करण्यात आलाय. या गणनेनुसार देशभरातील अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांची संख्या ८६ टक्के आहे. बहुतांशी अल्पभूधारक शेतकरी कर्जासाठी औपचारिक यंत्रणेकडे न जाता खासगी सावकारांकडे धाव घेतात. ०.०१ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्यांनी घेतलेल्या एकूण कर्जाच्या ७१ टक्के कर्ज हे खासगी सावकारांकडून घेण्यात आलेले आहे, तर केवळ २८ टक्के कर्ज हे औपचारिक बँकिंग व्यवस्थेकडून घेण्यात आलेले आहे.   याच्या अगदी उलट चित्र आहे ते १० हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्यांचे ! १० हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडील ६९ टक्के कर्ज हे औपचारिक बँकिंग यंत्रणेकडून घेण्यात आले असल्याचे या पाहणीतून समोर आले आहे.   ०.०१ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी घेतलेले ९३.१ टक्के कर्ज हे बिगरशेती कामांसाठी घेतलेले आहे. तर ०.०१ ते ०.०४ हेक्टरदरम्यान जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी घेतलेले ७१ टक्के कर्ज हे बिगरशेतीसाठी घेतलेले आहे. ०.४१ ते १ हेक्टरदरम्यान जमीन असलेल्यांमध्ये हे प्रमाण ५४ टक्के एवढे आहे. म्हणजेच शेती सोडून अन्य कामासाठी कर्ज घेणाऱ्या अल्पभूधारकांचे प्रमाण किती आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.  ०.०१ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्यांनी खासगी सावकारांकडून आणि बँकांकडून घेतलेल्या एकूण कर्जांपैकी केवळ २.६ टक्के रक्कम शेतीत भांडवल म्हणून वापरली आहे तर ४२ टक्के रक्कम शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी वापरली आहे. १३ टक्के कर्ज हे विवाह आणि इतर सण-समारंभासाठी वापरण्यात आलेले आहे. तर ४ टक्के कर्ज शेतीव्यवसायासाठी वापरण्यात आलेले आहे.     शेती व्यवसायातील भांडवली खर्च जसे जमीन खरेदी, जमिनीवरील हक्क इत्यादीसाठी केलेला खर्च हा जमीनधारणेनुसार वाढत असतो. जमीनधारणेनुसार बी-बियाण्यांची खरेदी,खते, चारा,शेतमजुरांची देणी हा खर्चही वाढत जातो. या पाहणीतील आकडेवारीतून अल्पभूधारकांनी घेतलेल्या कर्जाचा उपयोग वैद्यकीय खर्चासाठी करण्यात आला आहे. जसे रुग्णालयातील उपचार, डॉक्टरांची फी, औषधांची खरेदी, डॉक्टरांनी सांगितलेल्या विविध चाचण्या इत्यांदीसाठी करण्यात येतो. या अल्पभूधारकांच्या अन्य गरजांची पूर्तताही या कर्जाऊ रकमेतूनच होत असल्याचेही समोर आले आहे. ज्यात कुटुंबाच्या नित्य गरजा, कुटुंबातील सदस्यांसाठी कपड्यांची खरेदी इत्यादींचा समावेश होतो. ग्रामीण भारतातील ही आकडेवारी केवळ कृषी क्षेत्रासमोरील समस्यांपुरते बोलत नाही तर ती त्यांच्या रोजच्या जगण्यासाठीचा संघर्षही अधोरेखित करते आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com