एसटी संप : विलिनीकरणाच्या मुद्यावरून नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात गेल्या अडिच महिन्यांपासून लालपरीची सेवा बंद आहे. त्यातच आता महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
एसटी संप : विलिनीकरणाच्या मुद्यावरून नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ST Strike

मुंबई - गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Strike) सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. विलिनीकरणाच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्यांना या सदंर्भात पत्र लिहिले आहे.

हेही वाचा - एक हजार शेतकऱ्यांकडून  ८८.५३ टन रेशीम कोष खरेदी   राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून लालपरीची सेवा बंद आहे. त्यातच आता महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. एसटी संपाचा पेच सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारला समिती गठित करण्याचे आदेशही दिले आहेत. विलिनीकरणाच्या मुद्यासह समितीने बारा आठवड्यात अहवाल देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तीन सदस्यांची समितही गठित केली आहे. या समितीचा कालवधी येत्या २० जानेवारीला पूर्ण होणार आहे. परंतु त्यापूर्वीच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Assembly winter Session) उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  यांनी एसटीचे विलिनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

व्हिडीओ पाहा - 

दरम्यान, एसटी महामंडळाचे हित आणि प्रवाशांची सोय लक्षात घेता एसटी  कर्मचा-यांनी संप मागे घेण्याचे आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधताना केले. एसटी सध्या अडचणीत आहे याची जाणीव एसटीच्या कर्मचा-यांनाही आहे, अशा स्थितीत थोडी संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.