Supreme Court Hearing : नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जाणार

Maharashtra Poltical Crisis : सर्वोच्च न्यायालयात (supreme court) आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्रतेवर पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ या प्रकरणावर निकाल देण्यात आला.
Supreme court
Supreme courtAgrowon

Supreme Court Final Decision on Shivsena Case : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्रतेवर पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ या प्रकरणावर निकाल देण्यात आला.

सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) हा निकाल वाचून दाखवत महाराष्ट्राच्या निमित्ताने नबाम रेबिया प्रकरणाचा विषय आणखी मोठ्या घटनापीठाकडे जाणार असल्याचा निर्णय दिला.

Supreme court
Supreme Court Decision on Shiv Sena : सर्वाच्च न्यायालयचा शिंदे गटाला पहिला झटका; गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) बंड केले. या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. शिवसेना ठाकरे आणि शिंदे अशी दोन गटांत विभागली गेली. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं 18 फेब्रुवारी निकाल देत, शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) शिंदे गटाला (Shinde Group) दिला.

आज सर्वोच्च न्यायालयात निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत 2016 च्या नबाम रेबिया प्रकरणाच्या पुनर्विचाराची गरज वाटली आहे. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाणार आहे. अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित असेल तर ते आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय करू शकत नाहीत असा 2016 चा नबाम रेबिया प्रकरणाचा निकाल आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com