पीएम-किसानचा दहावा हप्ता कधी मिळणार?

राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी किंवा पीएम-किसान योजनेतील मदतीचा दहावा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न पडला होता. त्याचे उत्तर आता मिळाले आहे.
PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan Sanman Nidhi

रा ज्यातील एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी किंवा पीएम-किसान (PM-Kisan) योजनेतल्या मदतीचा दहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण तो कधी मिळणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. ती आता कृषी विभागाने (agriculture department) दूर केली आहे. येत्या शनिवारी, १ जानेवारीला पीएम-किसानचा पुढचा हप्ता मिळणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचे नऊ हप्ते वेळेत मिळाले आहेत. ठरलेल्या वेळापत्रकानुसार पुढचा, दहावा हप्ता २३ डिसेंबरला मिळणे अपेक्षित होते. पण तो तसा जमा होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली होती.

हा व्हिडिओ पाहिलात का? - 

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉंफरन्सिंगच्या माध्यमातून देशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान (PM-Kisan Samman Nidhi) योजनेच्या दहाव्या हप्त्याचे वितरण होईल. एएनआय या वृत्तसंस्थेनेही ट्विट करून या निर्णयाबद्दल माहिती दिली.

Prime Minister Narendra Modi will release the 10th installment of financial benefit under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 1st Jan at 12:30 pm via video conferencing: PMO

— ANI (@ANI)

दहाव्या हप्त्यापोटी राज्यातील किमान एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांमध्ये मिळून अंदाजे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या तयारीचा आढावा कृषी आयुक्त (Agriculture Commissioner) धीरज कुमार यांनी घेतला. मुख्य सांख्यिकी विनयकुमार आवटे, उपसंचालक जयंत टेकाळे, तंत्र अधिकारी संजय हिवाळे, तंत्र सहायक महावीर कानगुडे यावेळी उपस्थित होते.

"पात्र शेतकरी कुटुंबाला एका वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांची मदत देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र, ही मदत दर चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते. कृषी खात्याने पात्रतेविषयक माहितीला मान्यता दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात थेट लाभ हस्तांतरण होते. आतापर्यंत राज्यातील १०८ लाख ७० हजार शेतकऱ्यांना एकूण १५ हजार ९८७ कोटींहून अधिक मदत वाटली गेली आहे,"

अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी  ॲ ग्रोवनशी बोलताना दिली. त्यामुळे पीएम-किसान योजनेच्या दहाव्या हप्त्याची ताणलेली शेतकऱ्यांची उत्सुकता आता मिटली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com