LPG Gas Rate Hike : दुष्काळात तेरावा महिना; एलपीजी सिलेंडर १०५ रुपयांनी महागला

देशात इंधनाचे दर आधीच गगनाला भिडलेले आहेत, त्यात आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून (ता.१) वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनुसार, दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ झाली असून एका सिलेंडरसाठी २०१२ रुपये मोजावे लागणार आहेत.
LPG Rate Hike
LPG Rate Hike

देशात इंधनाचे दर आधीच गगनाला भिडलेले आहेत, त्यात आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG Cylender Rate) आजपासून (ता.१) वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनुसार, दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ झाली असून एका सिलेंडरसाठी २०१२ रुपये मोजावे लागणार आहेत.

Prices of 19kg commercial LPG cylinders increase by Rs 105 in Delhi and by Rs 108 in Kolkata; price of 5kg commercial LPG cylinders also rises by Rs 27. No increase in rates of domestic LPG cylinder. New rates are effective from today. pic.twitter.com/IQBIe5PuO4

— ANI (@ANI)

व्यावसायिक सिलेंडरचे दर (Commercial LPG Cylendr Rate) वाढल्याने त्याचा फटका इतर गोष्टींच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) युद्धाच्या झळा देशातील सामान्य नागरीकांनाही बसू लागल्या आहेत. याशिवाय देशात सध्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. ७ मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरही महाग होण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly election) सहाव्या टप्प्याचे मतदान ३ मार्च आणि सातव्या टप्प्याचे मतदान ७ मार्चला होणार आहे. अशा परिस्थितीत ७ मार्चनंतर घरगुती स्वयंपाकाच्या सिलेंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांचे अर्थकारण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. ६ ऑक्टोबरपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०२ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढल्या आहेत. 

ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत १७० रुपयांची वाढ झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १७३६ रुपये होती. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत २००० रुपये झाली आणि डिसेंबरमध्ये २१०१ रुपये झाली.  यानंतर, जानेवारीमध्ये , फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर खाली येऊन एक सिलेंडर १९०७ रुपयांवर आले होते. मात्र आता व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढले असून व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी दिल्लीत १९०७ रुपयांऐवजी २०१२ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात १९८७ ऐवजी २०९५ रुपये, तर मुंबईत त्याची किंमत १८५७ रुपयांवरून १९६३ रुपयांवर गेली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com