'शेकाप'चे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन 

'शेकाप'चे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी पाटील (N. D. Patil) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
'शेकाप'चे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन 
N.D. Patil

कोल्हापूर -  शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी पाटील (N. D. Patil) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ११ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (N. D. Patil Passed Away)

पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानतंर त्यांची प्रकृतीत कसलीच सुधारणा झाली नाही. वयोमानामुळे उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. वातावरणातील बदलामुळे कणकण वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रा. एन. डी.पाटील यांनी कोरोनाची (Covid Positive) लागण ही झाली होती, परंतु त्यातून ते सुखरुप बरे झाले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. अशोक भोपाली यांनी माहिती देताना सांगितले की, गेली अनेक दिवसांपासून पाटील हे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढण्यात आली होती.

११ जानेवारी रोजी त्यांचे बोलणेही बंद झाले होते. याच दिवशी काही तपासणी करून त्यांना ऍडमिट करण्यात आलं होते. त्यांची शुद्ध हरपल्याने ऍडव्हान्स उपचार (Advance Tratment) देऊन त्रास होईल, असे उपचार करू नयेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही मोठे उपचार केले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून त्यांची शुद्ध हरपली होती. तसेच मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला होता. श्वासोच्छ्वास कमी झाल्याने हायपोक्स झाला असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते अशी पाटील यांची ओळख होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.