पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन होण्याचा अंदाज

यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज आहे. या महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी चांगली मदत झाली आहे.
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन होण्याचा अंदाज
Rabbi Season

यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज आहे. या महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या (Rabbi Crop) पेरणीसाठी चांगली मदत झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणी (Wheat Sowing) क्षेत्र किरकोळ कमी असले, तरी तेलबिया (Oil Seed) आणि कडधान्यांच्या (Pulses) पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ होऊ शकते.

हेही वाचा - डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके, द्रवरूप युरियाचा वापर वाढवा - केंद्रीय कृषिमंत्री केंद्रीय कृषी मंत्रालयाने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या पेरणी अहवालानुसार, रब्बी पिकांची ६८० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून गेल्या वर्षी याच कालावधित ६७२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत पेरणीत एक टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय गेल्या वर्षीच्या याच कालावधित रब्बी पिकांच्या सामान्य पेरणी क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सामान्य पेरणी क्षेत्राची गणना गेल्या पाच वर्षांच्या एकरी सरासरी म्हणून केली जाते.

हेही वाचा - खतांची चढ्या दराने विक्री   गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत २०२१-२२ या पीक वर्षात अन्न धान्याचे उत्पादन जास्त होण्याची शक्यता यंदा झालेल्या पेरणी क्षेत्रावरून दिसते. रब्बी पेरणीच्या आकडेवारीनुसार, गव्हाचे पेरणी क्षेत्रात (Wheat Sowing Area) ४ लाख हेक्टरची घट झाली असली तरी कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रात १ लाख हेक्टरपेक्षा जास्त वाढ  झाली आहे. तर तेलबियांच्या पेरणी क्षेत्र २३ टक्क्यांनी वाढून २०१९-२० च्या तुलनेत १८ लाख हेक्टर झाले आहे. अनुकूल हवामान आणि पेरणी क्षेत्रातील वाढ यामुळे उत्पादन वाढीस मदत होऊ शकते. कृषी मंत्रालयाने यापूर्वीच २०२१-२२ मध्ये भाताच्या विक्रमी उत्पादनासह खरीप हंगामातील पिकांच्या उच्च उत्पादनाचा अंदाज वर्तविला आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com