बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढला

वाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यासाठी बीजप्रक्रिया यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे यंत्राद्वारे बीजप्रक्रिया करण्याकडे कल वाढून परिणामी पिकांची उगवण निरोगी होण्यास मदत होत आहे.
For seed processing The use of the device increased
For seed processing The use of the device increased

वाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यासाठी बीजप्रक्रिया यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे यंत्राद्वारे बीजप्रक्रिया करण्याकडे कल वाढून परिणामी पिकांची उगवण निरोगी होण्यास मदत होत आहे. 

जिल्ह्यामध्ये सन २०१९-२० च्या  खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या अवघे १.१० टक्के आणि रब्बी हंगामात ६.७३ टक्के बीजप्रक्रिया करण्यात आली होती. बीजप्रक्रियेबाबत कृषी विद्यापीठ, कृषी विभाग सतत प्रचार, प्रसिध्दी करीत आहे. तरीही बीजप्रक्रिया करण्याचे प्रमाण का वाढत नाही, याचा सखोल अभ्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केला. त्यांना प्रामुख्याने काही गोष्टीमुळे हे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

बीज प्रक्रियेसाठी लागणारे रासायनिक व जैविक औषध वेळेवर व पुरेशा प्रमाणात बाजारात उपलब्ध होत नाहीत. बीजप्रक्रिया करण्यासाठी यंत्र नसणे, पेरणीचा मर्यादित कालावधी, काही शेतकरी स्व:त बीजप्रक्रिया करताना हात भरतात, हाताला खाज येणे, डोके दुखणे आदी कारणामुळे बीजप्रक्रिया करण्यास टाळाटाळ करतात, असे दिसून आले. त्यामुळे उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन औषध पुरवठा व यंत्राव्दारे बीजप्रक्रिया करून देण्यासाठी ५९ बीजप्रक्रिया यंत्रे घेतली. 

उमेदच्या महिला बचत गटाच्या मदतीने बीजप्रक्रिया करून घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखला. त्याची गावनिहाय अमलंबजावणी खरीप व रब्बीमध्ये करण्यात आली. त्यामुळे बीजप्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढून खरिपात एकूण क्षेत्राच्या ३०.४५ टक्के व रब्बीमध्ये ५३ टक्के झाली. त्यामुळे खरिपात सोयाबीन उगवणीचे व रब्बीमध्ये हरभऱ्यावर मर रोगाच्या तक्रारी नगण्य आल्या. उत्पादनात वाढ झाली.

जिल्ह्यात बीजप्रक्रिया करण्याच्या प्रमाणात आणखी वाढ व्हावी, या दृष्टीने यंत्र कमी पडू लागली. त्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, गटांना ३१० बीजप्रक्रिया यंत्राचा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात ३५७ यंत्रांद्वारे बीजप्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे खरिपात उगवणीबाबत एकही तक्रार आली नाही. या पुढेही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, असेही तोटावार यांनी सांगितले. 

  बीजप्रक्रियेचे फायदे पिकांची उगवण चांगली होते. सुरुवातीचे २० दिवस पीक कीड व रोगमुक्त राहून जोमदार वाढते. फवारणीवरील खर्च कमी होतो. खर्चात बचत होते. १० ते १५ टक्के उत्पादन वाढते. हरभरा पिकाला मर रोगापासून संरक्षण मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com