पीकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे मुंडन आंदोलन 

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना रिलायन्स कृषी विमा कंपनीकडून पात्र असूनही पीकविमा दिला जात नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
पीकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे मुंडन आंदोलन 
Ravikant Tupkar

बुलडाणा - जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना रिलायन्स कृषी विमा कंपनीकडून (Relience Agri Insurance Company) पात्र असूनही पीकविमा दिला जात नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupakar) यांनी केला आहे. पीकविम्याच्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या तुपकरांनी स्वतः मुंडन करत प्रशासनाचा आणि विमा कंपनीचा निषेध केला आहे. यावेळी तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करून पीकविमा कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली. 

पिकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी चिखली कृषी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र, प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आता आमचे केस कापलेत आंदोलनावर तोडगा निघाला नाही, तर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्याचे केस उपटून काढू", असा इशारा तुपकरांनी दिला आहे. 

व्हिडीओ पाहा -  

तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे चिखली (Chikhali) कृषी कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्याचे कृषी अधिकारी (Agri Officer) व वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी चर्चेसाठी दाखल झाले होते.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.