२०२४ पर्यंत डिझेलमुक्त शेती; केंद्र सरकारचं उद्दिष्ट 

देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करायची जबाबदारी सामूहिक आहे, त्यासाठी देशातील सर्व घटकराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग महत्तवाचा असून प्रत्येकाने आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी काम करण्याची गरज असल्याचेही सिंग म्हणाले आहेत.
Diesel Free Agriculture
Diesel Free Agriculture

कृषी क्षेत्रातील डिझेलची गरज अक्षय ऊर्जेच्या (Reneweble Energy )माध्यमातून भागवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमानवाढ (Globle Warming) या समस्यांवर मात करताना भारताने २०२४ अखेरीस अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील डिझेलचा वापर संपूर्णतः थांबवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा, नवीनीकरण व अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग (R.K Singh) यांनी दिली आहे.

आर. के. सिंग यांनी नुकतेच केंद्रातील ऊर्जा विभागासह सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या ऊर्जा संक्रमण क्षेत्रातील उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी करण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती दिली आहे. ग्लासगो येथील परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील कार्बन उत्सर्जनाचे (Carben Emmession) प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

हेही वाचा -  दुप्पट शेतकरी उत्पन्नाचं काय झालं ? देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करायची जबाबदारी सामूहिक आहे, त्यासाठी देशातील सर्व घटकराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग महत्तवाचा असून प्रत्येकाने आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी काम करण्याची गरज असल्याचेही सिंग म्हणाले आहेत. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ या समस्यांना तोंड देण्यासाठी केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी समन्वय साधून एकत्रितरीत्या प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी कृषी आणि इतर सर्व संभाव्य क्षेत्रातील पारंपरिक इंधनाचा वापर कमी करून त्याऐवजी पर्यायी ऊर्जेच्या वापराचा आग्रह धरायला हवा.  

The Hon’ble Minister of Power and New & Renewable Energy, Shri R. K. Singh, chaired a meeting with the officers of @MinOfPower, @mnreindia, Addl. Chief Secretaries and Principal Secretaries of Power/Energy Departments of States & UTs… 1/2 pic.twitter.com/utIoljxc15

— Office of R.K. Singh (@OfficeOfRKSingh)

प्रत्येक राज्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबतचे आपले उद्दिष्ट आणि त्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा कृती आराखडा करायला हवा, असेही सिंग म्हणाले आहेत. आपण एका नव्या आणि आधुनिक भारतासाठी काम करत आहोत, हे काम पर्यायी व आधुनिक ऊर्जा पद्धती अंगिकार केल्याशिवाय शक्य नसल्याचे सांगताना सिंग यांनी त्यासाठी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनीही प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले आहे.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com