या सहा पर्यायांनी दाखल करा पीक नुकसानीच्या पूर्वसूचना

राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. यंदा खरीपानंतर रब्बीतही पिकांचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल होण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालायाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Crop Insurance
Crop Insurance

पुणे - भारताच्या आर्थिक विकासाचा कणा असलेला शेती हा या देशातील प्रमुख व्यवसाय आहे. देशातील जवळपास ९० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणूनच जगात भारताची ओळख ही कृषिप्रधान देश म्हणून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती (Agriculture) करताना मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्ती (natural calamity) तर कधी सरकारी धोरणांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अलिकडच्या काळात महाराष्ट्रात वातावरणातील बदलांचा शेती क्षेत्रावर थेट परिणाम होत आहे. 

अतिवृष्टी (Heavy Rain), वादळे (Cyclone), ढगफुटी, गारपीट (Thunder Strom) किंवा अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं पर्यायानं पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भपराईसाठी सरकारनं पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) आणली आहे. ज्यामुळे जरी पीक (Crop) हातचं गेलं तरी शेतकऱ्यांना पीकविम्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागत नाही.

महाराष्ट्रात यंदा खरीपानंतर रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतातील पिकांच नुकसान झाले असेल, तर नुकसान भरपाईसाठी पिकाच्या नुकसानीच्या पूर्वसूचना संबंधित पीकविमा कंपनीकडे दाखल कराव्या लागतात. बऱ्याचदा पीक नुकसानीच्या पूर्वसूचना (Intimation) दाखल न केल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती पीकविमा कंपनीला देणं गरजेचं असते. आता नुकसानीची माहिती कशी आणि कुठे द्यायची याबाबत बऱ्याचदा शेतकऱ्यांना अडचणी येतात. यावर राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे (Vinaykumar Awate) यांनी माहिती दिली आहे. 

पीक नुकसानीच्या (Crop Damage) सूचना देण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक किंवा ई-मेल, विमा कंपनीचे तालुका कार्यालय याशिवाय मंडळ कृषी अधिकारी कार्यालय किंवा विम्याचा हप्ता भरलेल्या बँकेच्या शाखेत शेतकरी पूर्वसूचना देऊ शकतात.  - विनयकुमार आवटे - मुख्य सांख्यिक, महाराष्ट्र शासन

नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल करण्यासाठी या सहा पर्यायांचा शेतकरी उपयोग करू शकतात. मात्र, पूर्वसूचना दाखल करण्यासाठी ७२ तासांची अट घालण्यात आली आहे. बऱ्याचदा तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना पूर्वसूचना दाखल करता येत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी हक्काच्या विम्यापासून वंचित राहतात.

व्हिडीओ पाहा - 

राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. यंदा खरीपानंतर रब्बीतही पिकांचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल होण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालायाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या संदर्भात विस्तार विभागाचे संचालक विकास पाटील (Vikas Patil) यांनी सहा विमा कंपन्या आणि सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्र लिहून पूर्वसूचनेचा मुद्दा लक्षात आणून दिला आहे. 

''विमाधारक शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्यास विमा भरपाईपासून तो वंचित राहणार नाही यासाठी जनजागृती करावी.''  - विकास पाटील - विस्तार संचालक, कृषी विभाग

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा व इतर भागांत गारपीट झाल्याने खरिपातील तूर व कापूस पिकाचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे हरभरा, ज्वारी आणि गहू या रब्बी पिकांचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात संबंधित शेतकऱ्यांकडून ७२ तासांच्या आत नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपन्यांना मिळणे आवश्यक आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com