दक्षिण पूर्व आशियाई देशांकडून भारतीय मक्याची खरेदी

दक्षिण पूर्व आशियाई देश यामध्ये प्रामुख्याने व्हिएतनाम आणि मलेशियाया देशांनी भारतीय मक्याची (Maize) मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
दक्षिण पूर्व आशियाई देशांकडून भारतीय मक्याची खरेदी
Maize

दक्षिण पूर्व आशियाई देश यामध्ये प्रामुख्याने व्हिएतनाम (Vietnam) आणि मलेशिया (Malesia) या देशांनी भारतीय मक्याची (Maize) मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. कारण जुलै २०२१ मधील दारांपेक्षा मक्याच्या किमतीत घट झाली आहे. व्हिएतनाम आणि मलेशिया मोठ्या प्रमाणात भारतीय मक्याची खरेदी (Maize Procurment) करत आहेत. परंतु मागणी जरी चांगली असली, तरी दर घटल्याने आम्हाला नफा मात्र मिळत नसल्याचे अॅग्री कमोडिटी एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (Agri Commodities Exporters Association) अध्यक्ष एम. मदन प्रकाश यांनी म्हटले आहे.

प्रकाश यांच्या राजथी फर्मने (Rajathi Firm) महाराष्ट्रातून १७ हजार ५०० रुपये प्रति टन दराने मका खरेदी केला आणि ५०० टन मक्याची कंटेनरच्या भाड्यासह २२ हजार ५०० रुपये प्रति टन दराने व्हिएतनामला निर्यात केली. "कुक्कुट खाद्यासाठी व्हिएतनाम भारतीय मक्याचा मोठा खरेदीदार बनला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे निर्यातदारांच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे", असे दिल्ली येथील व्यापार विश्लेषक एस. चंद्रशेखरन यांनी सांगितले. गेल्या महिनाभरात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १.७ टक्क्यांनी वधारला आहे. गुरूवारी भारतीय रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत ७४.४ रुपये इतका होता.

ब्राझीलने (Brazil) डिसेंबरमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी पीक उत्पादन नोदनवल्याने इंटरकॉन्टीनेंटल एक्सचेंजवर बुधवारी मक्याचे वायदे ६ डॉलर्स प्रति बुशेल्सवर आले. जुलै २०२१ मध्ये चीनने या हंगामात वापराचा अंदाज कमी केल्यानंतर मक्याचे वायदे ६.६ डॉलर्स प्रति बुशेल वर पोहोचले होते.     जास्त दराने मक्याची निर्यात शक्य नसल्याने आत्ता आम्ही जुन्या करारांची पूर्तता करत आहोत,” असे कोलकाता स्थित ट्रेडिंग हाऊस बेंगानी फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक बिमल बेंगानी (Bimal Bengani) म्हणाले. "मका निर्यातदारांना विशेषत: बांगलादेशात दराच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यांनी भारताकडून चांगली खरेदी केली होती.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com