सोयापेंडच्या सामान्य मागणीमुळे सोयाबीन दर स्थिरावले

बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळी भोवती फिरत आहेत. तसेच मागील पंधरवड्यापासून दर टिकून आहेत.
Soybean
Soybean

बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळी भोवती फिरत आहेत. तसेच मागील पंधरवड्यापासून दर टिकून आहेत. मागील आठवडाभरात सोयाबीनची आवक सामान्य होती. मात्र सोयापेंडला जास्त उठाव मिळाला नाही. त्यामुळे दर 6 हजार ते 6 हजार 400 रुपयांच्या दरम्यान राहीले.

सोयाबीनला वायद्यांमधून वगळल्यानंतर दर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार  ठरत आहेत. सध्या देशात सोयाबीनचे दर 5 हजार 900 ते 6 हजार 400 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारात दरदिवशी 200 ते 300 रुपयांची तेजी मंदी पाहायला मिळत आहे. वाढलेल्या दरात सोयापेंडची मागणी सामान्य राहिल्याने सोयाबीन एका भावपातळीभोवती फिरत आहे.

शेतकऱ्यांनी टप्प्याटप्याने सोयाबीन विक्री सुरु ठेवल्याने आवकेच दबाव नाही. त्यामुळे दर एका भावपातळीवर टिकून आहेत. मात्र,  देशांतर्गत सोयापेंडचे दर अधिक असल्याने देशांतर्गत बाजारात आणि निर्यातीसाठीही सोयापेंडला मागणी सरासरी आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कंटेनरची समस्याही आहे, अशे निर्यातदारांनी सांगितले.

देशात महिन्याला सोयापेंडची गरज तीन ते साडेतीन लाख टन असते. तर सध्या बाजारात दैनंदीन आवक सरासरी अडीच लाख पोत्यांची आवक होतेय. शेतकरी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकत असल्याने दर टिकून आहेत. मागील आठवड्यात दैनिक आवकेचा विचार करता मध्य प्रदेशात आवक सव्वालाख पोत्यांच्या दरम्यान होती. तर महाराष्ट्रात 1 लाख 10 हजार पोत्यांची आणि राजस्थानमध्ये  12 हजार पोत्यांची आवक राहीली. आठवडाभर सोयाबीन दर टिकून राहिले.

मध्य प्रदेशात सोयाबीनचा सर्वसाधारण दर 6 हजार 100 ते 6 हजार 350 रुपयांच्या दरम्यान होता. राजस्थानमध्ये सर्वसाधारण दर 6 हजार ते 6 हजार 400 रुपयांवर होता. तर महाराष्ट्रात मागील आठवड्यात 6 हजार ते 6 हजार 350 रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले. छत्तीसगडमध्ये सोयाबीनला सरासरी 6 हजार ते 6 हजार 300 रुपये दर मिळाला.

सोयापेंडचा विचार करता मागील आठवड्यात मागणी सामान्य राहिली. त्यामुळे दरात एक हजार रुपयांपर्यंत चढ-उतार होता. आठवडाभरात मध्य प्रदेशात 52 हजार ते 54 हजार रुपये प्रतिटनाने सोयापेंडचे व्यवहार झाले. राजस्थानमध्ये 53 हजार ते 55 हजार रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्रात प्रतिटन 53 हजार ते 56 हजार रुपये दर राहीला. देशातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता सोयापेंडचे दर टिकून राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com