इथेनॉल उत्पादनासाठी तांदळाच्या साठ्यात भरीव वाढ

भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच एफसीआयने चालू वर्षासाठी इथेनॉल उत्पादनासाठी तांदळाच्या साठ्यात ४६६ टक्क्यांची वाढ केली आहे.
Ethanol Production
Ethanol Production

भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation Of India) म्हणजेच एफसीआयने (FCI) चालू वर्षासाठी इथेनॉल उत्पादनासाठी (Production Of Ethanol) तांदळाच्या साठ्यात (Allocation Of Rice ) ४६६ टक्क्यांची वाढ केली आहे. डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ इथेनॉल पुरवठा वर्षासाठी (Ethanol Supply Year ) एफसीआयने तांदळाचा हा साठा राखून ठेवला आहे.

हेही वाचा - ब्राझील, अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटणारः युएसडीए इथेनॉल उत्पादनासाठी एफसीआयच्या बफर स्टॉकमधून वळवलेल्या अन्नधान्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री (Union Minister for Consumer Affairs, Food and Public Distribution) पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी लोकसभेत उत्तर दिले. केंद्राच्या बफर स्टॉकमधून अन्नधान्य (Foodgrain) वळवले जात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. "पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून सरकार एफसीआयकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त तांदळापासून इथेनॉल तयार करण्यासाठी आसवणी प्रकल्पांना सक्षम करत आहे", असे गोयल यांनी सांगितले.  

हेही वाचा - Top 5 News: कापसाच्या उत्पादनात अजून घट होणार? २०२०-२१ इथेनॉल पुरवठा वर्षात इथेनॉल उत्पादनासाठी (Ethanol Production) सरकारने २० रुपये प्रति किलो दराने ८१ हजार ४४ टन तांदळाचा साठा  आसवणी प्रकल्पांसाठी राखून ठेवला होता. यापैकी आसवणी प्रकल्पांनी ४९ हजार २३३ टन तांदूळ उचलला होता. चालू पुरवठा वर्ष २०२१-२२ साठी सरकारने २० रुपये प्रति किलो दराने ४ लाख ५८ हजार ८१७ टन तांदळाचा साठा राखून ठेवला आहे. यापैकी २७ जानेवारीपर्यंत आसवण्यांनी १९ हजार ९२९ टन तांदूळ एफसीआयच्या गोदामातून (FCI Godown) उचलला आहे.   गहू, तांदूळ खरेदी -  गहू, तांदूळ, ऊस आणि इतर पिकांच्या खरेदीबाबतच्या प्रश्नाला स्वतंत्र उत्तर देताना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, २०२१-२२ मध्ये ४३३.४४ लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय ६०१.८५ लाख टन तांदूळ आणि दोन हजार ९९६ लाख टन उसाची खरेदी २०२०-२१ मध्ये करण्यात आली आहे. २०२०-२१ मधील ४३.३५ लाख शेतकर्‍यांच्या तुलनेत २०२१-२२ च्या रब्बी विपणन हंगामात ४९.१९ लाख गहू उत्पादक शेतकर्‍यांना खेरदीचा  लाभ मिळाला आहे. तर  २०२०-२१ च्या खरीप विपणन हंगामात १.३१ कोटी धान उत्पादक शेतकर्‍यांच्या तुलनेत २०२१९-२० मध्ये १.२४ कोटी शेतकऱ्यांना खरेदीचा लाभ मिळाला होता.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com