Buldana : ‘साहेब, या रस्त्याने तुम्ही चालून दाखवा’

शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रशासनाला आर्त हाक
The incessant rains have made this road extremely miserable.
The incessant rains have made this road extremely miserable. Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः तालुक्यातील वानखेड (Vankhed) येथील रिंगणवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेले काही दिवस येत असलेल्या संततधार पावसाने (Rain) या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यातून जाणे-येणे अडचणीचे बनले आहे. रस्त्यात सर्वत्र चिखल तयार झाल्याने बैलगाडी तर सोडा, पायी चालणेसुद्धा कठीण बनले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना ‘साहेब, या रस्त्याने तुम्ही चालून दाखवा’ अशी आर्त हाक दिली आहे.

The incessant rains have made this road extremely miserable.
पोटापुरते शेत त्याचे, आकाशाच्या लाटा...

तालुक्याच्या राजकारणात वानखेड गावाची मोठी भूमिका राहिली आहे. पण विकासाच्या बाबतीत राजकीय पक्षांनी लक्ष न दिल्याने प्रामुख्याने शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मागील अनेक वर्षांपासून वानखेड-रिंगणवाडी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे. या रस्त्याच्या आजूबाजूने सुपीक जमीन आहे. सिंचनाच्या सुविधासुद्धा आहेत. मात्र केवळ रस्ता नसल्याने शेतकरी हे पावसाळ्याच्या चार महिन्यांत भाजीपाला, फळपिके घेऊ शकत नाहीत. कारण या काळात रस्त्याने बैलगाडी तर दूर साधे पायीसुद्धा जाता येत नाही.

The incessant rains have made this road extremely miserable.
Soybean Crop : सोयाबीन क्षेत्रात १९ हजार हेक्टरने वाढ

हा रस्ता करण्याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी केवळ आश्‍वासने दिली. परंतु कुणीही आपला शब्द पाळलेला नाही. आता पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत बिकट स्थिती बनलेली आहे. शेतकऱ्यांना कुठलेही वाहन नेता येत नाही. त्यामुळे शेतीमाल कसा आणायचा हा पेच आहे.

‘आता तरी लक्ष देणार का?’

रिंगणवाडी गावकऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांसाठी वानखेड येथील केंद्रास जोडलेले आहे. आज स्वातंत्र्याची ७५ वर्षे झाल्याचा गवगवा करीत अनेक कार्यक्रम केले जात आहेत. मात्र या ७५ वर्षांत शेतकऱ्याला शेतापर्यंत जायला चांगला रस्ता मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही. आता तरी कुणी याकडे लक्ष देईल का, असा प्रश्‍न वानखेड, रिंगणवाडी गावातील नागरिक विचारत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com