top 5 news : शेतकऱ्यांच्या दारातून तूर, हरभरा खरेदी करा !

आयात तूर आणि हरभऱ्यामुळे बाजारात दर पडतात. त्यामुळे आयात होणाऱ्या मालाचेही दर हमीभावाच्या दरम्यान असावेत. तसेच थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन तूर, हरभरा खरेदी करावी, अशी केंद्राकडे करण्यात आली.
Tur and gram
Tur and gram

1. राज्यातील काही भागांत मागील तीन दिवस पावसाने दणका दिला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे पिक नुकसानीचे प्रमाण वाढले. गुरुवारी राज्यातील काही भागांत पाऊस झाला. मात्र शुक्रवारी बहुतेक ठिकाणी वातावरण कोरडे राहून उन्हाचा चटका वाढला होता. तर काही ठिकाणी ढग दिसून आले. मागील तीन दिवसांत पिकांचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. परंतु द्राक्ष, डाळींब, पपई, आंबा, केळी, गहू, हरभरा, कांदा, मका या पिकांना फटका बसला. तर भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

2. सोयाबीनचे दर मुख्यतः सोयापेंडच्या दरावर अवलंबून असतात. सोयापेंडचा मुख्य ग्राहक पोल्ट्री उद्योगये(Poultry industry), हे आपल्याला ठाऊक आहेच. मात्र मानवी खाद्यान्य क्षेत्रातही सोयाबीनला मागणी वाढतेय. उच्च प्रोटीनमुळे सोयाबीन खाण्याला प्राधान्य दिले जातेय. मागील वर्षी ६ लाख टन सोयाबीनचा (Soybean)मानवी आहारात वापर झाला होता. तर यंदा यात ३३ टक्के वाढ होण्याची शक्यताये. यंदा मानवी आहारात ८ लाख टन सोयाबीनचा वापर होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. चालू हंगामात ५ महिन्यांत ३.४५ लाख टन सोयाबीनचा वापर झाला. गेल्या हंगमात याच काळात केवळ २.५५ लाख टन वापर होता. पशुखाद्यासह मानवी आहारातही सोयाबीनचा वापर वाढतोय. यामुळं सोयाबीनला मागणी वाढेल. यातून सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळेल.  

3. यंदा पावसाने लाल मिरची पिकाला मोठा फटका बसला. परिणामी मालाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. सध्या आवक होणाऱ्या मालात गुणवत्ता कमीये. बाजारात येणारा ५० ते ६० टक्के माल मध्यम गुणवत्तेचाये. चांगली गुणवत्ता केवळ २५ ते ३० टक्के मालामध्ये आहे. चांगल्या मालाला निर्यातीदारांसह स्टाॅकिस्टही(Stackist) पसंती देत आहेत. त्यामुळे बाजारात आवक वाढूनही दर टिकून आहेत. गुंटूर बाजारात दैनंदीन आवक जवळपास १ लाख पोत्यांच्या दरम्यान होतेय. असं असलं तरी लिलाव चढ्या दराने होत आहेत. बाजारात तेजा मिरचीचे दर प्रतिकिलो १८० रुपयांवर आहेत. तसेच वारंगल आणि हैदराबाद येथेही दर तेजीतये. महाराष्ट्रातही महत्वाच्या बाजारांत दर टिकूनये. गुणवत्तेचा माल कमी येत असल्यानं दर टिकून राहू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

4. युध्दामुळे सूर्यफूल तेल निर्यात घटलीये. अर्जेंटीनातून सूर्यफूल तेल निर्यात १४ टक्क्यांनी घटली. तर सूर्यफूल निर्यात ५७ टक्क्यांनी आणि सूर्यफूल पेंड १३ टक्क्यांनी कमी झाली. परिणामी तेलाचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेलाचे दर दोन आठवड्यांत ४७ टक्क्यांनी वाढले. सूर्यफूल तेलाचे दर सध्या २२५० डाॅलर प्रतिटनांच्या दरम्यान आहेत. अर्जेंटीनासोबतच रशियातूनही सूर्यफूल तेल निर्यात ४ टक्क्यांनी घटली. तर सूर्यफूल निर्यात ३३ टक्के आणि सूर्यफूल पेंड निर्यात ३ टक्क्यांनी कमी झाली. युएसडीएच्या मते जागतिक सूर्यफूल निर्यातीत युक्रेनचा वाटा ४७ टक्के तर रशियाचा हिस्सा २१ टक्के आहे. सूर्यफूल तेल महागला फायदा सोयाबीनला होत आहे. सोयाबीन दर सध्या बाजारात टिकून आहेत.

हे हि पहा :  5. यंदा सरकारने विक्रमी आयात केली. त्यामुळं तूर आणि हरभऱ्याचे दर दबावातये. यंदा तर तुरीचे उत्पादनही कमीये. मात्र आयात तूर कमी दरात मिळतेय. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दरही कमीये. तीच गत हरभऱ्याचीही झाली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे आयात तूरही हमीभावाच्या खाली बाजारात आणू नये, अशी मागणी होतेय. ग्राहक व्यवहार मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. मंत्रालयाचे सचिव, कडधान्य प्रक्रिया उद्योग, व्यापारी प्रतिनिधी आणि नाफेडचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. देशातील कडधान्य बाजारात होणारे अति चढ-उतार कमी करावी लागेल, त्यासाठी आयात शुल्कात बदल करावा. आयात तूर आणि हरभऱ्यासह कडधान्याचे दर हमीभावाच्या दरम्यान राहतील, असे धोरण आखावे, अशी मागणी पुढे करण्यात आली. तसेच कडधान्य प्रक्रिया आणि वाहतुकीत होणारे नुकसान अधिकये. हे कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराला प्रोत्साहन द्यावे. या बैठकित आयपीजीए या संस्थेने किमान आयात मुल्य धोरणात बदल करण्याची मागणी केली. लातूर येथील कलंत्री फुड्सचे नितीन कलंत्री यांनी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केल्यास वाहतुकीतील नुकसान होणार नाही. तसेच शेतकऱ्यांचा खर्चही कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारात कडधान्याची खरेदी व्हावी, ही मागणीही कलंत्री यांनी केली. देशात कडधान्य साठवणुकीच्या सुविधा कमी उपलब्ध आहेत. त्यांचा कार्यक्षम वापर करावा. युध्दामुळे तुटवडा भासू शकतो. त्यामुळे कडधान्याचा पर्याप्त साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे, असाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com