Top 5 News: सोयाबीन बाजाराला मिळतोय आधार

रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. तर ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन आणखी कमी होण्याचा अंदाजये.
soybean
soybean

1. राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला तडाखा दिला आहे. या पावासाने कांदा, रब्बी पिकांसह द्राक्ष बागांना फटका बसला. सध्या अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा केरळपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे. उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणात ही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

2. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे वायदे तेजीत आहेत. आयसीईवर साखरेचे वायदे तीन वर्षांतील उच्चांकावर आहेत. तर लंडनच्या वायदे बाजारातही साखर पाच वर्षांच्या विक्रमी दरावर आहे. कच्चे तेल बाजाराचा परिणाम साखरेच्या बाजारावरही दिसतोय. ब्रझीलमधील कारखान्यांनी यंदाही इथेनाॅलला पसंती दिलीये. चालू हंगामात थायलंडमधील साखर उत्पादन सध्या ५८ टक्के अधिक असल्याचं दिसतंय. तर ब्राझीलमधील उत्पादन १६ टक्यांनी माघारलं. देशात यंदा ३३३ लाख टन उत्पादनाचा अंदाज इस्मानं व्यक्त केलाय. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय साखर भाव खाईल, असं जाणकारांनी सांगितलं. 

 

3. आंतरराष्ट्रीय बाजारात कडधान्याचे दरही आता वाढले आहेत. बर्मा उडदाचे दर ८१५ डाॅलर प्रतिटनांवरून ८३० डाॅलरवर पोचले. तर तुरीचे दर ८८५ डाॅलरवर होते. रशिया-युक्रेन युध्दामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. याचा परिणाम जागतिक व्यापारावर होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात यापुर्वीच गहू, मका आणि खाद्यतेल तेजीत आले. आता याचा आधार कडधान्यालाही मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा अशीच सुरु राहिल्यास देशातही दर वाढतील. याचा थेट फायदा तूर उत्पादकांना होऊ शकतो. 

 

4. जागतिक पातळीवर लाल मिरची उत्पादनात भारत अग्रेसर आहे. तसेच निर्यातीतही आघाडीवरये. मात्र यंदा मिरची उत्पादनात यंदा २० टक्के घट येण्याचा अंदाज आहे. त्यातच अद्यापही बाजारातील आवक कमीचये. परिणामी दरात तेजीये. मागील चार महिन्यांत लाल मिरचीचे दर ८० टक्क्यांनी अधिक होते. तर पूर्ण हंगामात यंदा लाल मिरची भाव खाण्याची शक्यताये. सध्या देशातील बाजारात मिरचीला प्रतिक्विंटल ९ हजार ते १८ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. दर अधिक असल्याने निर्यातीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यताये. मात्र निर्यात जास्त घटणार नाही, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.  

5. रशिया युक्रेन युध्दामुळं खाद्यतेलाच्या दरात मोठी तेजी आलीये. त्यातच ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. सध्या ब्राझीलमधील सोयाबीन काढणी ५५ टक्के पूर्ण झाली. यंदा येथे बहुतांश भागांत दुष्काळी स्थिती असल्यानं काढणी वेगात सुरुये. मागील वर्षी याच काळात केवळ ३५ टक्के सोयाबीन काढणी झाली होती. येथील अॅगरुरल या संस्थेने ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचा अंदाज कमी केलाय. या संस्थेच्या मते यंदा १ हजार २२८ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाजये. तर आणखी एक संस्थेने उत्पादन १ हजार १९५ लाख टनांवर स्थिरावणार असल्याचं सांगितलं. अशीच परिस्थिती अर्जेंटीनातही आहे. सोयाबीन उत्पादन कमी झाल्यास सोयातेलही कमी मिळेल. त्यातच युध्दामुळे सूर्यफूल तेल मिळत नाही. पामतेल विक्रमी दराने मिळतेय. सध्या मलेशियाच्या वायदे बाजारात पामतेल विक्रमी ७ हजार ६६० रिंगीट प्रतिटनाने मिळतेय. तर सीबाॅटवर सोयातेल ८३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले. सोयाबीननेही १७.४५ डाॅलरचा टप्पा गाठला. देशातही मागील १५ दिवसांत पामतेलाच्या दरात तब्बल २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. म्हणजेच एकिकडे सोयाबीन उत्पादन घटतंय आणि दुसरीकडे खाद्यतेल बाजार तेजीतये. याचा लाभ देशातील सोयाबीन आणि मोहरीला मिळतोय. म्हणजेच सोयाबीनच्या तेजीला या परिस्थितीमुळे आधार मिळेल. सोयाबीनचे दर टिकून राहण्यास मदत होईल, असं जाणकारांनी सांगितलं. आपल्याला ही बातमी आवडली असेल, तर एक लाईक करून व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि तुम्हाला या विषयी काय वाटते, आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूच, तोवर पाहात राहा, ॲग्रोवन डिजिटल!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com