तुरीच्या दरात काहीशी सुधारणा

देशातील तूर आवकेचा हंगाम सुरु झाला. मात्र सध्या बहुतेक बाजारात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याची स्थिती आहे. तूर उत्पादनात कर्नाटक आणि महाराष्ट्र ही महत्वाची दोन राज्ये आहेत.
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा
Tur Rate

आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच उठाव राहिल्याने दरात 100 ते 150 रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. कर्नाटकात स्टाॅकिस्ट आणि प्लांट्सची खेरदी वाढल्याने दर काहीशे वाढले होते. तर महाराष्ट्रात दर काहीशे सधारले होते. मागील आठवड्यात तुरीचे दर 5 हजार 700 ते 6 हजार 400 रुपयांच्या दरम्यान राहिले.

देशातील तूर आवकेचा हंगाम सुरु झाला. मात्र सध्या बहुतेक बाजारात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याची स्थिती आहे. तूर उत्पादनात कर्नाटक आणि महाराष्ट्र ही महत्वाची दोन राज्ये आहेत. महाराष्ट्रातील काही भगांत पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात ओलावा होता. त्यामुळे तूर काढणीमध्ये अडचणी आल्या. त्यामुळे राज्य पातळीवर तूर आवक मंदावली होती.

तूर आवकेचा हंगाम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. मात्र अशी स्थिती असूनही विक्रमी आयात आणि शिल्लक साठ्यामुळे तुरीचे दर दबावात आहेत. मागील आठवड्यात तुरीची मागणी सामान्य राहिली. त्यामुळे तुरीच्या दरात काहीशी तेजी मंदी राहिली. बाजारात आवक होणाऱ्या नवीन तुरीमध्ये ओलावा अधिक आहे, असे नांदेड येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

सरकारची हमीभावाने तूर खरेदीची प्रक्रिया सुरु झाली असली तरी ओलावा अधिक असल्याने शेतकरी खुल्या बाजारात सध्या माल विकत आहेत. महाराष्ट्रात मागील आठवड्यात वातावरण आणि सणामुळे तूर आवक कमी होती. तसेच या काळात तुरीच्या दरात सरासरी 100 रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. मागील आठवड्यात महाराष्ट्रात जून्या तुरीला 6 हजार 50 ते 6 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नवीन तुरीला सरासरी 5 हजार 900 ते 6 हजार 300 रुपाये दर मिळाला.

कर्नाटकात मागील आठवड्यात तुरीला काहीशी मागणी राहीली. स्टाॅकिस्ट आणि मिल्स खरेदीत उतरल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकात मागील आठवड्यात तुरीच्या दरता काहीशी सुधारणा झाली होता. बीदर येथे मागील सप्ताहात तुरीच्या दरात 250 रुपयांची सुधारणा झाली होती. तर यादगीर आणि गुलबर्गा येथील बाजार समितीत  दर 50 ते 100 रुपयांनी वाढले होेते. मागील आठवड्यात कर्नाटकात तुरीचे दर 5 हजार 700 ते 6 हजार 400 रुपयांच्या दरम्यान राहीले.

तूर डाळीचा विचार करता आठवड्यात 150 ते 250 रुपयाने दरात सुधारणा झाली होती. मागील आठवड्यात तुरीला मागणी राहिल्याने दरात सुधारणा झाली होती. दिल्ली येथील बाजारात डाळीचे दर 8 हजार 750 ते 9 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल राहीले. तर अकोला येथे 8 हजार ते 9 हजार रुपये, गुलबर्गा येथे 9 हजार 100 ते 9 हजार 400 रुपये आणि इंदोर येथे 8 हजार 900 ते 9 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने डाळीचे व्यवहार झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.