कृषी कचरा शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग

शेतीतील टाकाऊ पदार्थ आणि पिकांच्या अवशेष पर्यावरणासाठी घटक असतात. पिकांची काढणी, कापणी आणि इतर शेती प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. भारतात पिकांचे अवशेष शेतात जाळले जातात. त्यामुळे प्रदूषणात पडणारी भर ही मोठी समस्या आहे.
Stubble Burning
Stubble Burning

शेतीतील टाकाऊ पदार्थ आणि पिकांच्या अवशेष (Stubble) पर्यावरणासाठी (Envoirment) घटक असतात. पिकांची काढणी, कापणी (Harvesting) आणि इतर शेती प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. भारतात पिकांचे अवशेष शेतात जाळले जातात. त्यामुळे प्रदूषणात पडणारी भर ही मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांसाठी टाकाऊ पदार्थ आणि पिकांचे अवशेष शेतातच जाळून त्याची विल्हेवाट लावणे हा सोपा आणि जलद मार्ग अंगिकारला जातो. परिणामी दरवर्षी उत्तर भारतात विशेषत: दिल्लीमध्ये हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

हेही वाचा - उन्हाळ हंगामात कडधान्य, तेलबियांचे क्षेत्र वाढणार ? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्पात टाकाऊ पदार्थ आणि पिकांच्या अवशेषांपासून इंधननिर्मितीचा मुद्दा उपस्थित करत या टाकाऊ पदार्थांपासूनही शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकेल, असा संदर्भ दिला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) या संस्थांच्या अभ्यासातही ही गोष्ट शक्य असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

हेही वाचा - प्रथिनेयुक्त आहारासाठी खाद्य क्षेत्रातून सोयामीलची मागणी वाढली शेतातील टाकाऊ पदार्थ आणि पिकांच्या अवशेषांची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. शेतीतील टाकाऊ पदार्थांचा, अवशेषांचे रूपांतर इंधनातं करण्यासाठी काही तंत्रज्ञान कंपन्या संशोधन करत आहेत. अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाची हानी तर टळेलच शिवाय शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त मार्गही तयार होईल. वीज निर्मितीसाठी एक भारतीय वीज निर्मिती कंपनीही या टाकाऊ पदार्थ आणि पिकांच्या अवशेषांपासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पावर काम करते आहे. याशिवाय एका मोठ्या सिमेंट कंपनीने शेतीतील कचरा इंधन म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी ग्रे सिमेंट, व्हाईट सिमेंट आणि रेडीमिक्स काँक्रिट तयार करण्यासाठी टाकाऊ पदार्थ आणि अवशेष खरेदी करणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com