‘वारणा’ ची मिक्स फ्रूट जॅम, चीज क्यूब, चीज स्लाइसची विक्री सुरू

येथील वारणा सहकारी दूध संघाची वारणा मिक्स फ्रूट जॅम, चीज क्यूब, चीज स्लाइस ही नवी उत्पादने विक्रीसाठी बाजारपेठेत आणली असल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
Milk Sabha
Milk SabhaAgrowon

वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी दूध संघाची वारणा मिक्स फ्रूट जॅम, चीज क्यूब, चीज स्लाइस ही नवी उत्पादने विक्रीसाठी बाजारपेठेत आणली असल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

वारणा दूध संघाने वेगवेगळ्या फळांच्या स्वादातील फ्रूट जॅम (Fruit jam) चीज क्यूब, चीज स्लाइस या नवीन उत्पादनाच्या विक्रीचा प्रारंभ संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.

वारणेचे दूध (Milk) श्रीखंड (Shrikhand) लस्सी, तूप, दही, ताक, इत्यादी उत्पादनांनी बाजारपेठ काबीज केली आहे. फ्रूट जॅम, चीज क्यूब व चीज स्लाइस उत्पादने आता विक्रीसाठी उपलब्ध झाली असून मिक्स फ्रूट स्ट्राबेरी, पायनापल, मॅंगो (Mango) व ऑरेंज जॅम इत्यादी उत्पादने बाजारात (Market) आणली जाणार आहेत असेही अध्यक्ष कोरे यांनी सांगितले.

Milk Sabha
मालेगावच्या शेतकऱ्यांचा कलात्मक फ्रूट केक 

कार्यकारी संचालक मोहन येडूरकर म्हणाले, सध्या वारणाच्या उत्पादनांना (Producat) मोठी मागणी आहे काही दिवसापूर्वीच दही, ताक, दुधाची (Milk) विक्रमी विक्री झाली असून, गुढीपाडव्या निमित्त वारणा श्रीखंडाला विक्रीसाठी मोठी मागणी आली आहे आता नवीन उत्पादनांची भर पडली. वारणाची मिक्स फ्रूट (Mix fruits जाम १०० ग्रॅम ते १ किलो पर्यंत आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध केले जाणार आहे.

सध्या ग्राहकांसाठी संघाने २०० ग्रॅम ग्लास बॉटलच्या किमतीमध्ये ६० ग्रॅम मोफत मिक्स फ्रूट जॅमची लॉंचिंग ऑफर दिली जाणार असून चीज क्यूब २० ग्रॅम अॅल्युमिनिअम फॉइल्समध्ये व चीज स्लाइस २० ग्रॅम स्लाइस फ्लेक्सी पॅकमध्ये उपलब्ध असून, वारणाकडून ग्राहकांसाठी (customers) सदर उत्पादनाबरोबर विविध प्रकारचे चीज व अन्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करणार असल्याचे श्री. येडूरकर यांनी सांगितले.

या वेळी संघाचे सर्व संचालक मंडळ, बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन, संघाचे अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंग इनचार्ज अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, माल्टेड फूड इनचार्ज अरविंद गवळी, संकलन व्यवस्थापक डॉ.अशोक पाटील, शरद शेटे, प्रवीण शेलार इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com