Karnataka Election 2023 : कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान सुरू

Karnataka Vidhan Sabha Election 2023 : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजप, काॅंग्रेस, जेडीएस आणि अपक्ष मिळवून 2163 उमेदवार रिंगणात आहेत
Karnataka Election Voting
Karnataka Election Votingagrowon

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये सर्व 224 विधानसभेच्या जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. निवडणूक आयोगाकडून सर्वच मतदान केंद्रावर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, जेडीएसचे अध्यक्ष एचडी कुमारस्वामी अनेक आपले नशिब आजमावून पाहत आहेत.

कर्नाटक निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे.सकाळपासूनच कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांतील मतदान केंद्रांवर मतदानासाठी लोक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत 8.26 टक्के मतदान झाले आहे.

Karnataka Election Voting
Karnataka Assemble Election 2023 : कर्नाटकची प्रयोगशाळा!

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांवर होणाऱ्या मतदानासाठी 58 हजार 282 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर 2 लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 2163 उमेदवार रिंगणात आहेत. 2,613 उमेदवारांपैकी 2,427 पुरुष आणि 185 महिला आहेत. राज्यात 5,30,85,566 कोटी नोंदणीकृत मतदार असून, त्यापैकी 2,66,82,156 पुरुष आणि 2,63,98,483 महिला मतदार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4,927 मतदार इतर प्रवर्गातील आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेले लोक पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करतील. सत्ताधारी भाजपने सर्व 224 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. विरोधी काँग्रेस पक्षाने 223 उमेदवार उभे केले आहेत. मेलुकोट जागेसाठी त्यांनी उमेदवार दिलेला नाही.

Karnataka Election Voting
Karnataka Election २०२३ : कर्नाटकमध्ये कुणाचं पारडं ठरणार जड? भाजप, कॉँग्रेस, जेडीएसमध्ये चुरस 

किंगमेकर बनण्याच्या आशेने, JD(S) पक्षाने 207 उमेदवार उभे केले आहेत आणि आम आदमी पार्टी (AAP) 209 जागांवर निवडणूक लढवत आहे. बसपा 133 जागांवर निवडणूक लढवत आहे. सीपीआय(एम) ने चार जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर एनपीपी दोन जागांवर निवडणूक लढवत आहे. एकूण ६९३ उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे असून ९१८ अपक्ष उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेस, जेडी(एस) आणि विशेषत: भाजप या प्रमुख पक्षांच्या प्रचाराचा उच्चांक पाहायला मिळाला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाच टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटी आणि नेतेही मतदानासाठी पोहोचत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत 8.26 टक्के मतदान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com