कोणत्या राज्यात किती टक्के मतदान ?

उत्तर प्रदेशात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.४४ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे तर गोव्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७५.२९ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. उत्तराखंडमध्ये ५९. ३७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
voting in UP,Uttarkhand and Goa
voting in UP,Uttarkhand and Goa

आज उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी मतदान (Voting)झाले असून  तर गोव्यातील ४० जागासाठी आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.  

उत्तर प्रदेशात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.४४ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे तर गोव्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७५.२९ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.  उत्तराखंडमध्ये ५९. ३७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

तिन्ही राज्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. देशात सध्या पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचा (Assembly elections) माहोल सुरू आहे. यामध्ये आज तीन राज्यात मतदान प्रकिया पार पडली आहे.

सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे.  तिन्ही राज्यात मिळून आज एकूण १६५ जागांसाठी मतदान झाले असून तिन्ही राज्यांत मिळून १ हजार ५१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.  

उत्तर प्रदेशातील ५५ विधानसभा जागांसाठी ५८६ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत होते तर  उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी ६३२ आणि गोव्यातील ४० जागांसाठी ३०१  उमेदवार होते. 

व्हिडीओ पहा- 

उत्तर प्रदेशात दुपारी ३ वाजेपर्यंत ६०. ६४ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.  रोहीलखंड म्हणून परिचित ९ जिल्ह्यांतील ५५ मतदारसंघातील निकालावर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची विशेष नजर असणार आहे.

या विभागात समाजवादी पक्षाचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने या विभागातून समाजवादी पक्षाच्या तुलनेत १७ जागा मिळवत चांगली कामगिरी केली होती. 

गोवा तुलनेने छोटे राज्य असूनही तिथे चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहे. आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हे पक्ष आखाड्यात उतरल्यामुळे गोव्यात चुरस वाढली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गोव्यात ‘पिंक’ बुथ संकल्पना राबविण्यात आली. हिमाचल प्रदेशानंतर ही संकल्पना राबविणारे गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे. यावेळी महिलांना गुलाबी रंगाचे कपडे घालून मतदान केले आणि त्यासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com