शेतकऱ्यांपेक्षा मोठी बाब काय आहे?

नाना पटोले यांचा अध्यक्ष नार्वेकरांना सवाल
Farmer
FarmerAgrowon

बाळासाहेब पाटील : ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : ‘‘पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास नसल्याने विरोधकांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या चर्चेची मागणी केली. मात्र, ती फेटाळून लावण्यात आली. या वेळी आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या नाना पटोले यांनी शेतकऱ्यांपेक्षा मोठी बाब काय असू शकते?,’’ असा सवाल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केला.

Farmer
Soybean Disease: सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव कसा टाळाल ? | ॲग्रोवन

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याची झलक विधानभवनाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळाल्यानंतर ती सभागृहातही पळायला मिळाली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव नाकारले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याची अनुमती अध्यक्षांनी दिली. मात्र, विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. यावर अभिनंदन प्रस्ताव होऊ द्या. गुरुवारी विरोधकांचा आठवडा प्रस्ताव येणारच आहे. त्यात आपण चर्चा करू, अशी सूचना केली.
यावर नाना पटोले म्हणाले, ‘‘अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलूच, पण अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्याची बिकट परिस्थिती झाली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्हे पाण्याखाली आहेत. घरे पडली आहेत. संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे. यापेक्षा महत्त्वाची बाब असू शकत नाही. त्यामुळे बळीराजा संकटात असताना आपण चर्चा केली पाहिजे. अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलले पाहिजेच, पण राज्याचा अन्नदाता अडचणीत आला असताना आपण सभागृहात भूमिका मांडली पाहिजे.’’

यावर हस्तक्षेप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरा करून बैठक घेतली आहे. तथापि विरोधकांच्या भावना लक्षात घेऊन सरकार लवकरच निवेदन करेल.’’

आज सरकारचे निवेदन
आजच्या (ता. १८) विरोधकांच्या प्रस्तावात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत निवेदन करण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष आणि भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी
अभिनंदनाच्या ठरावानंतर सभागृहात विविध विधेयके मांडण्यात आली. या वेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा विधेयक आणि दुसरी सुधारणा विधेयके मांडली. या वेळी अध्यक्ष नार्वेकर यांनी विधेयक क्रमांक १६ पुकारले आणि महाजन यांनी विधेयक क्रमांक १७ मांडले. याला शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. मात्र, नार्वेकर यांनी ‘आपण पुढे जाऊ’ असे म्हणताच, ‘आम्ही पॉइंट ऑफ ऑर्डर घेतला आहे. त्याला काही महत्त्व नाही का? असेच कामकाज रेटणार का? असा जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या प्रकाराला आक्षेप घेत महाजन यांना दुरुस्तीच्या सूचना देण्याची विनंती केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com