22 तारखेला कुठे होणार पाऊस?

20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर या दरम्यान तापमानातील चढ उतार कायम राहणार आहेत. तर येत्या दोन दिवसात राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होऊ शकते.
22 तारखेला कुठे होणार पाऊस?
Weather

20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर या दरम्यान तापमानातील चढ उतार कायम राहणार आहेत. तर येत्या दोन दिवसात राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होऊ शकते. या काळात राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसाची थंडी पूर्णपणे ओसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 22 तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र, पुणे, आणि कोकणात पावसाचा अंदाज असल्याचे मुंबई वेधशाळेने दिला आहे. तसेच 23 तारखेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तोवर मात्र थंडी कमीच राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.

22,23 Jan ला राज्यात; कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी, हलक्या पावसाची शक्यता. ढगाळ आकाश. - IMD मुंबई pic.twitter.com/px3peUphJ9

— K S Hosalikar (@Hosalikar_KS)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.