महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

महसूल विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्‍त आहेत.
Revenue employees
Revenue employeesAgrowon

नगर : महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी, अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून थांबलेली नायब तहसीलदार पदोन्नती करावी आदी मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. ४) महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील महसूल कर्मचारी (Revenue employees) सहभागी झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह, प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले.

Revenue employees
Chana Bajarbhav: हरभरा बाजारात संमिश्र स्थिती

महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करीत महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, सहचिटणीस भागवत नवगण, महसूल संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर कांबळे, सरचिटणीस अक्षय फलके, संघटक शंकर जगताप आदी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.

महसूल विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्‍त आहेत. महसूल कर्मचारी संघटनेतर्फे शासन दरबारी वारंवार अर्ज, विनंत्या आणि निवेदने देत पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रलंबित मागण्यांची पूर्तता झाली नाही. महसूलमधील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी, अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील मागील दोन वर्षांपासून पदोन्नती रखडली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची नोटीस देण्यात आली. या नोटिशीनुसार चार एप्रिलपासून महसूल कर्मचाऱ्यांनी (Revenue employees) बेमुदत संप पुकारला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com