समर्पित व्यापारी बंदरांच्या उभारणीची गरज

देशात माल वाहतुकीसाठी समर्पित व्यापारी बंदरांची संख्या कमी असून व्हिझिन्गजम (Vizhinjam) येथे मोठी जहाजे थांबू शकतील अशा मोठ्या व्यावसायिक बंदराची उभारणी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार डॉ. शशी थरूर(Shashi Tharoor) यांनी नुकतीच लोकसभेत केलीय.
Need to develop all-weather deep-water port in India, says Shashi Tharoor in LS
Need to develop all-weather deep-water port in India, says Shashi Tharoor in LS

देशात माल वाहतुकीसाठी समर्पित व्यापारी बंदरांची संख्या कमी असून व्हिझिन्गजम (Vizhinjam)  येथे मोठी जहाजे थांबू शकतील अशा मोठ्या व्यावसायिक बंदराची उभारणी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार डॉ. शशी थरूर(Shashi Tharoor) यांनी नुकतीच लोकसभेत केलीय.   लोकसभेतील(Lok Sabha) जल मार्ग, शपिंग आणि बंदर मंत्रालयाच्या मागण्यांवरील चर्चेत लोकसभेत बोलताना थरूर यांनी, व्हिझिन्गजम येथील बंदर उभारणीची मागणी केली आहे. व्हिझिन्गजम (Vizhinjam)  हे जागतिक समुद्री मार्गावर येते. कमोडिटीजच्या आयात निर्यातीसाठी भारतात समर्पित अशा व्यापारी बंदरांची संख्या सीमित आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे ही उणीव आपल्याला अधिक अधिक तीव्रतेने जाणवते आहे.  भारतीय समुद्री परिसरातील चीनच्या प्रभुत्वामागचे तेही एक कारण असल्याचं सांगताना थरूर यांनी, भारतातील एखाद्या बंदरांपेक्षा जास्त भारतीय कमोडिटीजची वाहतूक कोलंबोवरून होत असल्याचं सांगितलं आहे. एकट्या कोलंबोच्या बंदरावरून जेवढी भारतीय वस्तूंची वाहतूक होते तेवढी भारतातील प्रमुख बंदरांवरूनही होत नाही.

आपल्या वस्तूंच्या निर्यातीसाठी असं कोलंबोवर अवलंबून असणं हे आपल्या भौगोलिक धोरणाच्या दृष्टीनंही योग्य नाही. कारण ज्या समुद्री परिसरात चीन अधिक सक्रिय आहे अशाच परिसरात कोलंबो हे बंदर मोडते. त्यामुळे चीननेही व्यापारी दृष्टीकोनातून त्या बंदरांवर विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे.   निव्वळ व्यापारी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समर्पित अशी बंदरे विकसित करणे गरजेचे आहे. जगातील ९० टक्के कमोडिटीजची वाहतूक जलमार्गाने होत असते, अशावेळी भारताला आपल्या निर्यातीवाढीचे उद्दिष्ठ गाठायचं असेल तर जागतिक समुद्री मार्गावर व्यापारी बंदरांची उभारणी अनिवार्य असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे.

व्हिडिओ पाहा  २०१७-२०१८ सालीच संसदेने त्यासाठीची संसाधने, अधिकार संबंधित मंत्रालयाला बहाल केले होते. मात्र अद्यापही या मंत्रालयाने याबाबत निर्णायक कामगिरी पार पाडलेली नाही. धोरणात्मक खबरदारी म्हणून आपण भारतीय बंदर उभारणी क्षेत्रात चीनला गुंतवणुक करण्यापासून रोखले आहे, आणि बिनधास्तपणे चीनच्या प्रभावाखालील बंदरांवरून आपली मालवाहतूक होऊ देतोय, हा प्रकार धक्कादायक असल्याचं सांगताना थरूर यांनी, मोठ्या आकाराची जहाजे पाडाव टाकू शकतील, अशी बंदरे आपण का उभारत नाही आहोत ? असा सवालही उपस्थित केला आहे. बहुतांशी माल वाहतूक करणारी जहाजे भारतीय (India) बंदरावर थांबत नाहीत कारण त्यासाठीचा अवास्तव खर्च त्यांना टाळायचा असतो. याचा अर्थ आपण अप्रत्यक्षरीत्या इतर देशांच्या बंदरांना उत्पन्न (Income) मिळवून देत असल्याची खणत खंतही थरूर यांनी व्यक्त केलीय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com