उत्पादनवाढीला हवीय प्रक्रिया उद्योगाची जोड

मका, ऊस, सोयाबीन, सूर्यफूल अशा पिकांना सक्षम पर्याय म्हणून मिलेटकडे पाहायचे असेल तर मिलेट्सच्या अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या वाणांचा विकास, या उत्पादनास योग्य भाव आणि मूल्यवृद्धीसाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिलक्ष लेखी यांनी व्यक्त केली आहे.
Finger-millet
Finger-millet

संयुक्त राष्ट्रसंघाकडून (United Nations Organisation) २०२३ चे वर्ष इंटरनॅशनल इअर फॉर मिलेट (आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष ) जाहीर करण्यात आले आहे. भारत सरकारनेही काढणीनंतरच्या मूल्यवृद्धीस आधार देत भरडधान्य उत्पादन वाढीस चालना देण्याचे मान्य केले आहे.  

गहू आणि तांदळापेक्षा मिनरल्स (Minerals), व्हिटॅमिन्स (vitamins) आणि प्रोटिन्स (protein) अशी पोषक घटके अधिक प्रमाणात समाविष्ट खाद्य म्हणून भरडधान्याचा उल्लेख केला जातो. राजस्थान (Rajsthan) ,उत्तर प्रदेश (Uttar pradesh), गुजरात(Gujrat), हरियाणा (Haryana) ,महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka)या राज्यांत मोठ्या प्रमाणात मिलेट लागवड केली जाते. कर्नाटक, तेलंगणामध्येही (Telangana) काही ठिकाणी मिलेटची लागवड केली जाते.   

उत्तराखंड आणि तामिळनाडूमध्ये मिळत लागवडीचे प्रमाण अत्यल्प असे आहे. देशभरात सरासरी १४ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात मिळत लागवड केली जाते अन १६ दशलक्ष टन वार्षिक उत्पादन घेतले जाते.  

मका (Maize), ऊस (Sugarcane), कापूस (Cotton),सोयाबीन (Soyabean), सूर्यफूल (Sunflower) अशा पिकांना सक्षम पर्याय म्हणून मिलेटकडे पाहायचे असेल तर मिलेट्सच्या अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या वाणांचा विकास, या उत्पादनास योग्य भाव आणि मूल्यवृद्धीसाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिलक्ष लेखी यांनी व्यक्त केली आहे.  

भरडधान्य उत्पादनाबाबत सरकारी यंत्रणेची अनास्था 

मिलेट्स उत्पादनांना प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली तरच देशातील मिलेट्स लागवडीखालील क्षेत्र वाढेल. आजवर मिलेट्सच्या वाढीमागे सरकारी यंत्रणांची अनास्था हेही प्रमुख कारण राहिले असल्याचे बोलल्या जाते.       मिलेटमधील पोषक घटकांशी तडजोड न करता प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून लागवडीत वाढ करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लावण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. 

व्हिडीओ पहा- 

अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या मिलेट्स उत्पादनासाठी Electronic Agricultural National Market (e-NAM) सारखी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही अनिवार्य बाब आहे आहे. दर्जेदार उत्पादनाचा आग्रह धरताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाढीव दर मिळणे गरजेचे आहे त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Company) आणि प्रक्रिया उद्योजकांची संख्या वाढवायला हवी. 

यासंदर्भात तामिळनाडूमधील एक उदाहरण पथदर्शी ठरू शकेल, असे आहे.  DMillets या नावाने धर्मापुरी जिल्ह्यातील जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीने (Farmer Producer Company) शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे उपलब्ध करून दिले, योग्य भाव दिला, तांत्रिक मदत केली याशिवाय या कंपन्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात मूल्यवृद्धी करत मिलेट्सपासूनची अनेक उत्पादने विकसित करत आहेत. कुकीज, स्प्राउटेड फ्लोअर, फ्लोअर अशी अनेक उत्पादने 'DMillets' या ब्रँड नावाने बाजारपेठेत आणल्या जात आहेत.  

असेच दुसरे उदाहरण ओडिसात पहायला मिळते. ओडिसाच्या नियमगिरी पहाडी इलाख्यात स्थानिक नागरिकांकडून विविध प्रकारची उत्पादने घेण्यात येतात. या परिसरातील आदिवासींनी अधिक पोषक घटकांनी युक्त कोडो मिलेट विकसित केली आहे. या धर्तीवर ओडिसा सरकारने पाच वर्षांसाठी मिलेट्स मिशन राबवले आहे.

ज्यात अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांना मिलेट्स उत्पादनांतील वैविध्य, उत्पादनवाढीसाठी अनुदान, तांत्रिक मदत, रास्त दर आणि मूल्यवृद्धीसाठी यंत्रणात्मक पाठबळ दिले आहे.       

ओडिसाच्या मिलेट्स अभियानाला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक सरकारनेही असेच अभियान राबवायला सुरुवात केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com