agriculture story in marathi, control of endoparasites in livestock | Agrowon

वेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजीवींचे नियंत्रण
डॉ. रवींद्रनाथ निमसे, डॉ. विष्णू नरवडे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक मंदावून उत्पादनात व प्रजोत्पादनात घट येते. त्यामुळे लक्षणे अोळखून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.
 

आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक मंदावून उत्पादनात व प्रजोत्पादनात घट येते. त्यामुळे लक्षणे अोळखून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.
 

जनावरांच्या आहारातील पोषण मूल्यांपैकी २० ते ३० टक्के पर्यंत सत्व परोपजीवी खातात. जंताचे प्रमाण कमी असताना विशेष लक्षण न दिसल्याने होणारे नुकसान जास्त असते, कारण प्रथम दर्शनी जनावर निरोगी भासत असते. असे हे नुकसानकारक परोपजीवी आंत्र व बाह्य दोन प्रकारचे असतात. आंत्र परोपजीवींमध्ये गोल कृमी, चपटे कृमी व पर्णकृती असे तीन उप प्रकारात आढळतात तर बाह्य परोपजीवीमध्ये उवा, गोचीड, लिखा, गोमाशी, डास यांचा समावेश होतो. या शिवाय एकपेशीय परोपजीवी हा सुद्धा एक नुकसानकारक प्रकार आढळून येत आहे.

लक्षणे

  • नवीन कालवडी, पारड्या, बकरे, करडे यांची वाढ व्यवस्थित होत नाही.
  • जनावरांची भूक मंदावून उप्तादनात व प्रजोत्पादनात घट येते.
  • जनावर व्यवस्थित माजावर येत नाही.
  • रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होऊन जनावर कायम आजारी पडते.
  • लसीकरणाचा योग्य परिणाम दिसत नाही.
  • जनावराचे पचन बिघडून शेण पातळ होणे, शेणाचा वास येणे, शेणात आम पडणे असे लक्षण दिसून येतात.
  • केसांची चमक कमी होऊन केस राट होतात.
  • वाढीच्या वयातील कालवडी, पारडी व गोऱ्हे यांचे पोट ढेबरे होते. वजन वाढ योग्य प्रमाणात होत नाही तर जनावर गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. दूध उप्तादनात घट येते.

उपचार

  • सर्वसाधारणपणे वर्षातून तीन ते चार वेळा जंत निर्मूलनाचा कार्यकम हाती घेणे गरजेचे आहे.
  • बंदिस्त अथवा एकाच जागी असणाऱ्या जनावराकरिता तीन वेळा व चारावयास जाणाऱ्या जनावराकरिता चार वेळा जंत निर्मूलन करणे गरजेचे असते. यापैकी ऋतू बदलावेळी म्हणजे पावसाळ्यापूर्वी पावसाळ्याच्या नंतर हिवाळा संपताना व गरज भासल्यास पावसाळ्याच्या मध्यावर जंत निर्मूलन कार्यक्रम करणे गरजेचे असते.
  • वाढीच्या वासरामध्ये योग्य प्रकारे जंत निर्मूलन कार्यक्रम केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा बाबींमध्ये १२ ते १३ महिने वयाची कालवड २५० किलो वजनाची झाल्याची उदाहरणे दिसून आलेली आहेत.
  • जंत निर्मूलनाकरिता अल्बेन्डेझोल, फेनबेन्डेझोल, मेबेन्डेझोल, लीव्होमिसोल, मोरेन्टेल सायटरेट, ऑक्सिक्लोज़ेनाइड, निक्लोज़्यामाइड, आयव्हरमेकटीन ही औषधे वजनानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वापरली जातात.

जंत निर्मूलन करताना घ्यायची काळजी

  • सर्व जनावरांचे एकाच वेळी जंत निर्मूलन करावे.
  • गाभण जनावरांमध्ये अल्बेन्डेझोल हे औषध वापरू नये, योग्य पर्यायी औषध पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.
  • औषध योग्य मात्रेतच द्यावे, त्याकरिता वेष्टनावरील सूचना पाळाव्यात.
  • जास्त मात्रा अपायकारक तर कमी मात्रा योग्य परिणामकारक दिसून येत नाही.
  • प्रत्येक वेळी औषध बदलून द्यावे म्हणजे जंतामध्ये औषधी प्रतिरोधकशक्ती विकसित होणार नाही.
  • औषध सकाळी चारा देण्यापूर्वी उपाशी पोटी दिल्यास परिणामकारकता वाढते.
  • जास्त प्रादुर्भाव असल्यास पंधरा दिवसांनी पुन्हा औषध पाजावे.
  • लसीकरण करण्यापूर्वी जंत निर्मूलन केल्यास लसीची परिणामकारकता वाढते.

संपर्क ः डॉ. रवींद्रनाथ निमसे, ०२४२६ - २४३३६१
(गो संशोधन व विकास प्रकल्प, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...