agriculture news in marathi, fuel hike not in our hands says central Minister | Agrowon

इंधनाचे दर आमच्या हातात नाहीत : केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद
वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे हे सरकारच्या हातात नाहीत, असे सांगत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हात झटकले. तसेच, काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदला जनतेचा पाठींबा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसनेच्या आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 

नवी दिल्ली : इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे हे सरकारच्या हातात नाहीत, असे सांगत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हात झटकले. तसेच, काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदला जनतेचा पाठींबा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसनेच्या आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
रवीशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर हे तेल कंपन्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत. तसेच, ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. आज जो बंद पुकारला आहे त्यात देशाचे नुकसान होते आहे. बिहार या ठिकाणी रुग्णवाहिकेमध्ये एक मुलगा अडकल्याने मरण पावला आहे. याला राहुल गांधीच जबाबदार असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

त्याचबरोर, अनेक ठिकाणी बसेस जाळल्या जात आहेत. पेट्रोल पंपांची तोडफोड केली जाते आहे या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, मनमोहनसिंग यांना थेट आव्हान देताना रवीशंकर प्रसाद यांनी त्यांच्यासोबत अर्थिक गोष्टींवर संसदेत चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...