Agriculture news in marathi Maha FPC reviews purchase by farmers companies | Agrowon

शेतकरी कंपन्यांच्या हमीदराने खरेदीचा `महाएफपीसी`तर्फे आढावा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हमीदराने खरीप पिकांच्या केलेल्या खरेदीचा आढावा महाएफपीसीने गुरुवारी (ता. २१) औरंगाबादेत घेतला. स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात त्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

औरंगाबाद : मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हमीदराने खरीप पिकांच्या केलेल्या खरेदीचा आढावा महाएफपीसीने गुरुवारी (ता. २१) औरंगाबादेत घेतला. स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात त्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या बैठकीला महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात यांच्यासह विठ्ठल पिसाळ, प्रा. गंगाधर शिंदे, प्रशांत पवार, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे आदींची उपस्थिती होती. खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांची एफपीसीमार्फत हमीदराची उघडली गेलेली केंद्रे, त्यामध्ये झालेली शेतकरी नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी, हमीदराने शेतीमाल खरेदीत येणाऱ्या अडचणी आदीची मांडणी या बैठकीत करण्यात आली. 

शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी अडचणींची मांडणी केल्यानंतर विविध पातळ्यांवर त्या अडचणींची सोडवणूक कशा पद्धतीने करता येईल. धोरणात्मक स्तरावर अडचणींची सोडवणूक करण्याच्या बाबी नेमक्‍या कोणत्या याचाही ऊहापोह या बैठकीतून केला गेल्याचे श्री. योगेश थोरात यांनी सांगितले. येत्या काळात तूर खरेदी व रब्बीमधील हरभऱ्याच्या खरेदीची स्थिती नेमकी काय राहील, याचाही आढावा या वेळी घेण्यात आल्याचे थोरात म्हणाले. 

उद्योगातील संधींची चाचपणी करताना तंत्रज्ञानाचा वापर याविषयी परभणी कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्रासह राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. पवार व डॉ. झाडे यांनीही शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. कृषीतील अद्यावत तंत्रज्ञान व उद्योगातील संधीविषयीची माहिती शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली. ओवा पिकातील संधी पाहून नगर जिल्ह्यातील एका शेतकरी उत्पादक कंपनीने औरंगाबाद जिल्ह्यातील ओवा उत्पादक शेतकऱ्यांशी संवादाची तयारी दाखविल्याचे डॉ. झाडे म्हणाले. 

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह नगर, पुणे, बुलडाणा, जळगाव आदी जिल्ह्यांतील ८९ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 


इतर बातम्या
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
इंदापुरातील सिंचन सर्वेक्षणासाठी पाच...पुणे : ‘‘इंदापूर तालुक्यातील प्रलंबित शेती...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...