Agriculture news in marathi In Jat, Kavthemahankal taluka, 22,000 vaccines were given to 4,000 animals | Agrowon

जत, कवठेमहांकाळ तालुक्यात चार हजार जनावरांना २२ हजार लसी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

सांगली : ‘‘जिल्ह्यातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जनावरांमध्ये ‘लंम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

सांगली : ‘‘जिल्ह्यातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जनावरांमध्ये ‘लंम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने जत तालुक्यात १८ हजार, तर कवठेमहांकाळ तालुक्यात ४ हजार जनावरांना एकूण २२ हजार लसी दिल्या आहेत’’, अशी माहिती उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात १३ लाख १६ हजार जनावरांची संख्या आहे. त्यापैकी जत ३ लाख १ हजा १४५ आणि कवठेमहांकाळ तालुक्यात १ लाख ३५ हजार ५५ इतकी जनावरे आहेत. जिल्ह्यात शेतीबरोबर पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. दुष्काळी पट्ट्यातील जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्यासह आटपाडी, खानापूर तालुक्यात पशुपालन मुख्य व्यवसाय बनला आहे. दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे घर चालते. 

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पशुधनामध्ये ‘लंम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याचा प्रसार काही प्रमाणात वाढू लागला असल्याचे चित्र आहे. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात हा प्रादुर्भाव झाला आहे.

जत तालुक्यातील ८ गावात १३ जनावरे, तर कवठेमहांकाळ तालुक्यात ४ गावात आठ जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हा रोग लवकर नियंत्रणात आला नाही, तर जनावरे दगावण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने रोगाचा प्रादुर्भाव होताच, पशुधन विकास अधिकाऱ्यांसह डॉक्टरांची टीम या भागात पाठवली आहे. जनावरांची तपासणी करण्यास सुरवात केली आहे. ज्या गावात जनावरांना ‘लंम्पी स्कीन’चा  प्रादुर्भाव झाला आहे, त्या गावाच्या पाच किलोमीटरचा परिसरातील जनावरांना लसीकरण सुरु आहे. 

जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील जनावरांना ‘लंम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लगेच उपचार सुरु केले आहेत. त्यामुळे रोग आटोक्यात आला आहे.  
- डॉ. एस. एस. बेडक्याळे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, सांगली


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...