Agriculture news in Marathi Farmers in Nanded lose grass due to heavy rains | Agrowon

नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने हिरावला घास

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १७० टक्के पावसाची नोंद झाली. तर ऑक्टोबरमध्येही तब्बल १३४ टक्के पाऊस झाल्यामुळे खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांचे शासनाच्या भरपाई तसेच पीकविमा परताव्याच्या मंजूरीकडे लक्ष लागले आहे.

नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १७० टक्के पावसाची नोंद झाली. तर ऑक्टोबरमध्येही तब्बल १३४ टक्के पाऊस झाल्यामुळे खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांचे शासनाच्या भरपाई तसेच पीकविमा परताव्याच्या मंजूरीकडे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक सात लाख ७७ हजार ६२८ हेक्टर क्षेत्र खरिपात पिकाखाली येते. तर रब्बीमध्येही तब्बल तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. सात लाख ९५ हजार आठशे खातेदार शेतकऱ्यांची संख्या असलेल्या नांदेड जिल्ह्यात सतत नैसर्गिक संकट येत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. यंदा जूनमध्ये चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी मृग नक्षत्रात पेरणीला सुरवात केली.

पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यामुळे पेरलेले सोयाबीन निघाले नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी. यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती चांगली होती. अशातच सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात तब्बल २३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यात नांदेडमधील एक, बिलोली पाच, मुखेड सहा, कंधार दोन, हदगाव दोन, देगलूर चार, धर्माबाद एक व नायगाव दोन अशा मंडळाचा समावेश आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये सरासरी १६७.४० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र १७० टक्क्यानुसार २८४.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याकाळात सोयाबीन, ज्वारी, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला. या महिन्यात हदगाव तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. ऑक्टोबरमध्ये सरासरी ५४.६० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असते. परंतु या महिन्यातही १३४.८० टक्क्यानुसार ७३.६० मिलिमीटर पाऊस झाला.


इतर बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
शिरपूर परिसरातील शिक्षक, मुख्याध्यापक `...शिरपूर, जि. धुळे : नववी ते बारावीचे वर्ग...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...