agriculture stories in Marathi precautions at time of bagging of grapes | Agrowon

द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना घ्यावयाची काळजी

योगेश भगुरे
शनिवार, 2 जानेवारी 2021

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळविण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे.

अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन बर्निंग, पिंकबेरी इ. समस्या वाढलेल्या आहेत. या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळविण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे.

द्राक्ष पीक हे अन्य पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असले तरी बदलत्या हवामानाला अत्यंत संवेदनशील पीक आहे. या नाजूक फळपिकाची जपणूक करण्यासाठी अधिक खर्चही येतो. दिवसेंदिवस द्राक्ष पीक अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. मात्र, योग्य नियोजन, नवीन तंत्र यांचा योग्य वापर केल्यास द्राक्षाचे निर्यातक्षम उत्पादन शक्य आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन म्हणजे द्राक्ष घडात योग्य आकाराचे मणी, एकसारखा, आकर्षक रंग, गोड, कीड – रोग विरहित, कीडनाशक अवशेष मुक्त असलेला घड होय.
अलीकडे वातावरणातील बदलांमुळे सन बर्निंग, पिंकबेरी इ. समस्या वाढलेल्या आहेत. या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळविण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे .

घडांना पेपर लावण्याआधीची पूर्वतयारी ः

१) द्राक्ष घडांना पेपर लावण्याची योग्य अवस्था –
साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावावे. त्या आधी बागेतील कीड रोगाचे नियंत्रण उत्तम झालेले असल्याची खात्री करावी. अन्यथा घड लावूनही कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

२) घड व मणी विरळणी –
निर्यातीसाठी आवश्यक असलेला मण्यांचा आकार, घडाची लांबी, सुटसुटीत व एकसारखेपणा, गोडी या बाबी मिळण्यासाठी वेलीवरील घडांची संख्या व प्रत्येक घडातील मण्यांची संख्या योग्य असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी पेपर लावण्याआधी वेलीचे वय, लागवडीचे अंतर, जात इ. गोष्टींचा विचार करून घडांची संख्या निर्धारित करावी. एकसारख्या वाढीचे, आकर्षक , कीड रोग विरहित घड ठेवावेत. कीड-रोगांचा प्रादुर्भाव असलेले, पानांच्या आड, गर्दीत असलेले, एकसारखा आकार नसलेले अतिरिक्त घड काढून टाकावेत. तसेच खराब, कमी आकाराचे, गर्दी करणारे मणी काढून जातीपरत्वे प्रत्येक घडातील मणी संख्या निर्धारित करावी. यामुळे प्रत्येक वेलीवर योग्य घड व मणी संख्या राहून निर्यातक्षम उत्पादन मिळण्यास मदत होईल.

३) काडी व घडांची बांधणी –
पेपर लावण्याआधी काड्यांची व घडांची बांधणी करून घ्यावी. त्यामुळे पेपर लावणे सोयीचे होईल.

४) कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी –
एकदा द्राक्ष बागेत पेपर लावल्यानंतर आपण फवारणीद्वारे वापर केलेल्या किटकनाशकांचा घडांशी संपर्क येत नाही. त्यामुळे पेपर लावण्याअगोदर कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषकरून मिलीबग (पिठ्या ढेकूण) चे नियंत्रण करून घ्यावे. यासाठी काढणीपूर्व कालावधीचा विचार करून योग्य त्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. तसेच व्हर्टीसिलीयम लेकॅनी सारख्या जैविक कीडनाशकांचा वापर शिफारशीनुसार करावा.

५) बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी–
द्राक्ष पीक विविध बुरशीजन्य रोगांना उदा. केवडा, भुरी , करपा इ. बळी पडते. यासाठी पेपर लावण्याअगोदर बुरशीनाशकांच्या काढणीपूर्व कालावधीचा विचार करून फवारणी घ्यावी. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी, बॅसिलस सबटिलीस यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर महत्त्वाचा ठरतो. यामुळे रोगनियंत्रण होऊन रासायनिक औषधांचे अवशेष कमी होण्यास मदत होईल.
अशाप्रकारे सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर कुशल मजुरांद्वारे घडाना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून योग्य अवस्थेत पेपर लावण्याचे काम पूर्ण करावे.

द्राक्ष घडांना पेपर लावण्याचे फायदे –
१) द्राक्ष घडांचे उन्हे व त्यामुळे होणाऱ्या जळणे (सन बर्निंग) सारख्या
समस्यांपासून संरक्षण होते.
२) घडांचे थंडीपासून संरक्षण होऊन मण्यांचा योग्य आकार मिळण्यास मदत होते.
३) पिंक बेरी या समस्येपासून मुक्तता मिळते. किंबहुना ही समस्या टाळण्यासाठी घडांना पेपर लावणे हा एकमेव उपाय आहे.
४) घडांचे पक्षी, प्राणी यांच्यापासून होणारे नुकसान टाळता येते.
५) द्राक्ष काढणी वेळी निर्यातीसाठी आवश्यक मण्यांचा आकार, आकर्षक एकसारखा रंग मिळून निर्यातक्षम मालाचे उत्पादन वाढते.

पेपर लावण्याआधी व नंतर करावयाच्या उपाययोजना ः
१) घड व मणी विरळणी
२) किटकनाशक व बुरशीनाशक यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर
३) कुशल मजुरांचा उपयोग करून घडांना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून पेपर लावावे.
४) पेपर लावल्यानंतर ठराविक काळाने प्रातिनिधिक स्वरूपात घडांची मिलीबग, भुरी इ.साठी तपासणी करावी.

योगेश भगुरे, ९९२२४१४८७३
( सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के.डी.एस.पी कृषी महाविद्यालय, नाशिक.)


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...