agricultural news in marathi, news regarding packing of vegetables , Agrowon, Maharashtra | Agrowon

पॅकिंग शोषणार फळातील ओलावा
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

वाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता खालावते. त्यामुळे दर कमी मिळतो. हे लक्षात घेऊन पॅकेजिंगसाठी सातत्याने नवीन संशोधन होत आहे. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे फळांतील ओलावा शोषणारे पॅकेजिंग तज्ज्ञांनी विकसित केले आहे.

वाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता खालावते. त्यामुळे दर कमी मिळतो. हे लक्षात घेऊन पॅकेजिंगसाठी सातत्याने नवीन संशोधन होत आहे. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे फळांतील ओलावा शोषणारे पॅकेजिंग तज्ज्ञांनी विकसित केले आहे.

टोमॅटो, रॉसबेरी, स्ट्राॅबेरी या फळांच्यामध्ये रस मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या फळांची वाहतूक आणि साठवण काळजीपूर्वक आणि कमी वेळेत करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन नेदरलॅंडमधील तज्ज्ञांनी फळातील जास्तीचा ओलावा शोषून घेणारे पॅकिंग विकसित केले आहे. हे पॅकिंग ठरावीत प्रमाणातच फळातील ओलावा शोषून घेते, त्याचा फळाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही. फळाची साल कोरडी रहाते. त्यामुळे फळाचा साठवण कालावधी तीन दिवसांनी वाढविणे शक्य झाले आहे. येत्या काळात विविध फळे, भाजीपाल्याची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे पॅकेजिंग पनेट तयार करण्यात येत आहे. सध्या टोमॅटोच्या बरोबरीने सफरचंद आणि स्टॉबेरी फळांच्या साठवणुकीबाबत प्रयोग करण्यात येत आहेत. पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांमध्ये प्लॅस्टिकचा प्रामुख्याने वापर केला जातो. परंतु, आता मक्यातील स्टार्चचा वापर केल्याने हे पॅकिंग नैसर्गिकरीत्या विघटन पावते. अशा प्रकारच्या पॅकिंगला चांगली मागणी आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...