Agriculture News in Marathi Parbhani Bandla Composite response | Agrowon

परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 सप्टेंबर 2021

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सोमवारी (ता. २७) पुकारलेल्या भारत बंद अंतर्गंत परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सोमवारी (ता. २७) पुकारलेल्या भारत बंद अंतर्गंत परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हमाल, कामगार बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. सोनपेठ-पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील विटा येथील तसेच गंगाखेड परभणी रस्त्यावरीळ खळी येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ झरी येथे परभणी जिंतूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

सेलू येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अनेक गावांतील शेतकरी, कामगार सहभागी झाले होते. स्वाभिनी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष आदी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. 
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...