Agriculture news in Marathi, organic farming | Agrowon

सेंद्रिय शेती संशाेधन, प्रशिक्षणसाठी २० कोटी

शासन निर्णय
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान, विविध पिकांची शेती पद्धती विकसित करून प्रयाेगशाळांची निर्मिती, मूलभूत सुविधा निर्मिती, सेंद्रिय शेतीसाठी अवजारे, सिंचन सुविधा, दृकश्राव्य उपकरणे, पशू, पक्षी संगाेपन, प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

पुणे : नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि कार्यक्षम वापरातून गुणवत्तापूर्ण दर्जेदार विषमुक्त अन्नधान्य आणि भाजीपाला निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीमध्ये संशाेधन व विस्ताराला चालना देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सेंद्रिय शेती संशाेधन व प्रशिक्षण केंद्र स्थापनेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

यासाठी प्रत्येक विद्यापीठाला पाच काेटी प्रमाणे २० काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  हरितक्रांतीनंतर शेतीमध्ये वाढलेल्या रसायनांच्या भरमसाट वापराबराेबरच हवामान बदल आणि यांत्रिकीरणामुळे पशुधनाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शेतीवर विपरित परिणाम झाले आहेत.

शाश्‍वत शेती करण्यासाठी पर्यावरणाचा समताेल साधत नैर्सगिक संसाधनांचा काटेकाेर आणि संतुलित वापर करीत रसायन मुक्त अन्नधान्य आणि फळे भाजीपाला उत्पादन करण्यासाठीच्या शेती पद्धतींचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील  राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापाेली (काेकण) येथील डॉ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठ, अकाेला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रिय शेती संशाेधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. 

मूलभूत सुविधांसह शास्त्रज्ञ नियुक्ती
या केंद्रांमधून सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान, विविध पिकांची शेती पद्धती विकसित करून विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रयाेगशाळांची निर्मिती, मूलभूत सुविधा निर्मिती, सेंद्रिय शेतीसाठी अवजारे, सिंचन सुविधा, दृकश्राव्य उपकरणे, पशू, पक्षी संगाेपन, प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तर या विभागासाठी प्रमुख शास्त्रज्ञाची देखील नियुक्ती करण्यात येणार आहे. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी...कोल्हापूर : नव्या सरकारकडून कर्जमाफीची शक्यता...
हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभनागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला...
कापूस वेचणी यंत्राचा पर्याय कधी मिळणार...अमरावती ः राज्यात कापसाचे सरासरी सुमारे ४० लाख...
...आता बटाट्याचीही टंचाईकोल्हापूर: कांद्यापाठोपाठ आता बाजारपेठांमध्ये...
कर्जमाफीची `कट ऑफ डेट` ३१ ऑगस्ट ठेवासोलापूर : युती सरकारने दीड लाखाची कर्जमाफी देऊनही...
गारठ्यात हळूहळू वाढपुणे  ः कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...