मोठ्या प्रमाणात फणस उत्पादनासाठी ओडीशा सरकारची योजना

फळांच्या पौष्टीक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच ओडीशा सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणात फणसाच्या उत्पादनाची योजना आखली आहे.
Jackfruite
Jackfruite

फळांच्या पौष्टीक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच ओडीशा सरकारने (Odisa Government) राज्यात मोठ्या प्रमाणात फणसाच्या (Jackfruite) उत्पादनाची योजना आखली आहे. ओडीशामध्ये फणसाच्या लागवडीला (Jackfruite Cultivation) प्रोत्साहन देण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव एस. सी. महापात्रा (S.C Mahapatra) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पौष्टीक फळांच्या उत्पादनाबाबत आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - भरडधान्यांना राजाश्रय मिळेल का? ओडीशामध्ये नैसर्गिकरित्या पिकणाऱ्या फणसामध्ये व्हिटामीन सी, पोटऑशिअम, फायबर आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वांसह खनिजे आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, एक कप कच्च्या फणसामध्ये १५७ कॅलरी आणि २.८४ ग्रॅम प्रथिने असतात. सर्व अँटिऑक्सिडंट्सप्रमाणे, (Antioxidants) कॅरोटीनोइड्स (Carotenoids) पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. याशिवाय फणस कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या आजारावर तसेच मोतीबिंदू (Cataract ) आणि मॅक्युलर डिजेनेरेशनसारख्या (Macular Degeneration) डोळ्यांच्या समस्या टाळण्यास फायदेशीर ठरते.

हेही वाचा - 'गेमचेंजर' तंत्रज्ञानामुळे पालटेल शेतीचे चित्र फणसामध्ये पौष्टीक मूल्य असून राज्यातील हवामान फणसाच्या उत्पादनासाठी योग्य असल्याचे महापात्रा यांनी सांगितले. दर्जेदार लागवड साहित्य, कापणीनंतरची प्रक्रिया, आणि विपणन (Marketing) यांसारख्या आवश्यक सुविधांसह फलोत्पादन विभागाने (Horticulture Department) फणसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मिलेट मिशन उपक्रमाच्या धर्तीवर फणसाबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकरी त्याचे व्यावसायिक उत्पादन घेऊ शकतील, असे ते म्हणाले.

स्थानिक उद्योजकांनी काढणी पश्चात प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सध्या सुरू असलेल्या फलोत्पादन योजना आणि मनरेगा यांच्या संयुक्त विद्यमाने फणसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचे निर्देशही महापात्रा यांनी दिले. त्रिपूरानंतर ओडीशा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा फणस उत्पादक असल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि कृषी उत्पादन आयुक्त संजीव चोप्रा यांनी बैठकीत सांगितले. ओडीशाच्या सर्व जिल्ह्यात फणसाची झाडे आढळतात. राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांनी फणसाच्या उत्पादनात मोठा वाटा उचलला आहे. ओडीशामध्ये वर्षाकाठी सुमारे ३.१५ टन फणसाचे उत्पादन होते. फणसाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ५५ टक्के कच्चा भाजीपाला म्हणून आणि ३५ टक्के सणासुदीत फळे म्हणून वापरली गेली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com