रत्नागिरी जिल्ह्यात वादळाचा तडाखा; नुकसानीच्या पंचनाम्यांची मागणी 

फळबागांच्या नुकसानीशिवाय नागरी यंत्रणेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली. छपरांवरील कौले, पत्रे उडून मोठे नुकसान झाले. तसेच वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
Orchards in Rajapur taluka have been hit the hardest
Orchards in Rajapur taluka have been hit the hardest

कोकण (Kokan) व परिसराला बुधवारी सायंकाळी उशिरा चक्रीवादळाचा (Hurricane) मोठा फटका बसला असून राजापूर तालुक्यातील फळबागांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आंबा (Mango),काजू (Cashew) हंगामाच्या प्रारंभीच वादळाचा फटका बसल्यामुळे काही फळबागा उध्वस्त झाल्या आहेत.   

तळकोकणाच्या जवळच्या परिसराला वादळाचा बसलेला हा दुसरा फटका आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात बुधवारी सायंकाळी उशिरा चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. राजापूर (Rajapur) तालुक्याच्या पूर्व भागातील रायपाटण, पाचलमध्ये जोरदार पडझड झाली.

ऐन आंबा, काजू हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच या वादळाने पुन्हा आंबा (Mango), काजू (Cashew)बागांना मोठा दणका दिला असून काही बागा वादळात उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. 

व्हिडीओ पहा- 

फळबागांच्या नुकसानीशिवाय नागरी यंत्रणेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली. छपरांवरील कौले, पत्रे उडून मोठे नुकसान झाले. तसेच वीज पुरवठाही खंडित झाला आहे. 

वादळाचा सर्वाधिक फटका राजापूर तालुक्यातील रायपाटण, पाचल आदी गावांना बसला.  काही क्षणातच वादळी वा-याचे रूपांतर चक्रीवादळ सदृष्य परिस्थितीत झाले व क्षणार्धात अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. या वादळात अनेकांच्या घरावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यांमध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले. वादळात घरांवरील कौले पत्रे उडाली, तर पाचलमधील होळीच्या मांडावरदेखील पडझड झाल्याची घटना घडली. 

तसेच ठिकठिकाणी झाडेही उन्मळून पडली. वादळी पावसाचा जोरदार तडाखा आंबा, काजू पिकांना बसला. अनेक ठिकाणी आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. कलमे वाकून मोडून पडली. शासन स्तरावरून या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com