फळबागांची हॉर्टिनेटद्वारे करा नोंदणी कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर ः कीटकनाशक उर्वरित अंश व कीड-रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते, यंदाही निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना निर्यातीसाठी नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
फळबागांची हॉर्टिनेटद्वारे करा नोंदणी  कृषी विभागाचे आवाहन
फळबागांची हॉर्टिनेटद्वारे करा नोंदणी कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर ः कीटकनाशक उर्वरित अंश व कीड-रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते, यंदाही निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना निर्यातीसाठी नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. गेल्यावर्षी २०२०-२१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातून १४८६ हेक्टर क्षेत्रावर २०४९ फळबाग व भाजीपाला प्लॉटची नोंदणी झाली. यंदा २०२१-२२ साठी ही नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी नोंदणी किंवा नूतनीकरणाकरिता कृषी विभागाच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्वरित विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा, ८ अ उतारा, बागेचा नकाशा, व आवश्यक नोंदणी फीसह अर्ज करावेत व आपल्या प्लॉटची नोंदणी करावी, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. नोंदणीची मुदत, शुल्क या प्रमाणे ग्रेपनेट, पीक- द्राक्ष,-ऑक्टोबर २०२१ ते नोव्हेंबर २०२१ -५०/-रुपये प्रति १.५० हेक्टर क्षेत्राकरीता / द्राक्ष लेट फी- नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१-१००/- रु प्रति १.२० हेक्टर क्षेत्राकरिता. मँगोनेट- आंबा- डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२- फी आवश्यकता नाही. अनारनेट-डाळिंब-ऑक्टोबर २०२१ ते जानेवारी २०२२- फी आवश्यकता नाही. व्हेजनेट-भाजीपाला-वर्षभर सुरू परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक – फी आवश्यकता नाही. सिट्रसनेट-लिंबुवर्गीय-वर्षभर सुरू, परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक- फी आवश्यकता नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com